चंद्रपूर जिल्हयातील बाधितांची संख्या २०८चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधिताची संख्या २०८ झाली आहे. १०५ बाधित सध्या जिल्ह्यात उपचार घेत आहेत. तर १०३ बाधित सध्या कोरोना संक्रमणातून मुक्त झाले आहेत.त्यापैकी १६ जण हे जिल्ह्याबाहेरील बाधित असून राज्य राखीव पोलीस दलाचे १० जवान व ६ जण अन्य राज्याचे रहिवाशी आहेत.
१४ जुलै रोजी रात्री उशिरा आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार बिहार राज्यातून ८ जुलै रोजी चंद्रपूर शहरातील ऊर्जा नगरात आलेल्या ४१ वर्षीय संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातून आज रात्री पुन्हा तीन बाधित पुढे आले आहे. यामध्ये तालुक्यातील कुर्झा नगर येथील 43 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या ठिकाणच्या यापूर्वीच्या पॉझिटिव्ह व्यक्तीची ही महिला पत्नी असून कुटुंबातील मुलांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत. महिलेचे स्वॅब ९ जुलै रोजी घेण्यात आले होते.
ब्रह्मपुरी तालुक्यातील बोरगाव येथील रहिवासी असणाऱ्या २७ वर्षीय मुंबईवरून परत आलेल्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. ९ जुलैला मुंबईवरून आल्यानंतर हा युवक सुरुवातीला गृह व नंतर संस्थात्मक अलगीकरणात होता. १३ तारखेला त्याचा स्वॅब घेण्यात आला होता.
        ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापूर या गावांमध्ये झारखंड राज्यातील रहिवासी असणाऱ्या ३९ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरला आहे. ५ जुलै रोजी हा व्यक्ती लाखापूर परिसरात आला होता. त्यानंतर या नागरिकाला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले. स्वॅब नमुना १३ जुलै रोजी घेण्यात आला होता.
  तत्पूर्वी,आज दुपारी पुढे आलेल्या बाधितामध्ये चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही तालुक्यातील मोहाडी येथील २३ वर्षीय नागरिक पॉसिटीव्ह आला आहे. हैद्राबाद येथून ९ जुलैला आलेला हा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता.
     भद्रावती येथील बंगळूरू शहरातून १० जुलैला परत आलेल्या २२ वर्षाच्या पुरुषाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. ११ जुलैला स्वॅब घेण्यात आला होता.
        चंद्रपूर अंचलेश्वर गेट जवळील केरळ राज्यातून परत आलेला २८ वर्षीय युवक पॉझिटीव्ह ठरला आहे. ९ जुलैला आलेला हा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता. १२ जुलैला त्यांचा स्वॅब घेण्यात आला. आज पॉझिटीव्ह अहवाल आला.
      या शिवाय पॉझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कातून बाधित झालेले ३ जण पुढे आले आहेत. यामध्ये सिव्हिल लाइन चंद्रपूर येथील एका कारखान्यात काम करणाऱ्या यापूर्वी पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेली ४७ वर्षीय पत्नी, १८ व १० वर्षीय दोन मुले यांचा सहभाग आहे. या सर्वांचा स्वॅब १२ जुलैला घेण्यात आला होता.
         दरम्यान , जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार  चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) २८ जून ( एकूण ६ बाधित ) २९ जून ( एकूण ८ बाधित ) ३० जून ( एक बाधित ) १ जुलै ( २ बाधित ) २ जुलै ( २ बाधित ) ३ जुलै ( ११ बाधित ) ४ जुलै ( एकूण ५ ) ५ जुलै ( एकूण ३ ) ६ जुलै ( एकूण ७ )  ८ जुलै ( एकूण ५ )  ९ जुलै ( एकूण १४ ) १० जुलै ( एकूण १२ ) ११ जुलै ( एकूण ७ ) १२ जुलैला ( एकूण १८) १३ जुलैला ( एकूण ११ ) व १४ जुलै ( एकूण १० ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित २०८ झाले आहेत. आतापर्यत १०३ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २०८  पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता १०५ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.