जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याची सभापती विजय कोरेवार यांची मागणी



सावली - कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने मागील शैक्षणिक वर्षात शाळांना सुट्ट्या जाहीर केले. 26 जून ला शैक्षणिक सत्राला सुरवात झाली मात्र कोरोनामुळे शाळा सुरू झालेल्या नाही. परंतु स्थानिक गावातील परीस्थिती व पालकांची मागणी लक्षात घेऊन शाळा सुरू करण्यात यावे यासाठी पंचायत समिती सावलीचे सभापती विजय कोरेवार यांनी विविध कारणे देत जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी केली आहे
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नव्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू झालेल्या नाहीत. पण स्थानिक परिस्थिती व पालकांची मनस्थिती शाळा सुरू करण्याची असल्याने विविध दाखले देत शाळा सुरू करण्याची मागणी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी केली आहे. उदाहरणादाखल सावली तालुक्यातील मागील वर्षीची पटसंख्या ही 50 विद्यार्थीपर्यंत पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या 50 टक्केच्या वर तर 100 पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या 70 टक्केच्या वर आहे. त्यामुळे या शाळांमध्ये सोशल डिस्टन्सचे नियम पाळता येऊ शकतात. मुले गावात असल्याने कोरोनाचे कोणतेही नियम न पाळता फिरत असतात त्यामुळे शैक्षणिक नुकसान व आरोग्याची चिंता ग्रामीण भागातील पालकांमध्ये असल्याचे नमूद केले आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल सारखे साहित्य उपलब्ध नाही, गावातच शाळा असल्याने वाहनाने गर्दीत न जाता पायी जातात त्यामुळे संसर्गाची भीती नसल्याचे सभापतीनी नमूद केले आहे. मात्र शाळा शिक्षकांनी मुख्यालयी राहूनच सेवा द्यावी याकरीता मुख्यालयी सक्तीचे करण्याची मागणी प्रामुख्याने केली आहे. जर मुख्यालयीची अंमलबजावणी झाल्यास शाळा सुरू करण्याची मागणी योग्य असल्याचे पालकांकडून बोलल्या जात आहे.