मोठी कारवाई :- जीवती पोलिसांनी वाहनासह पकडली 7 लाख 44 हजार रूपयांची दारू

मोठी कारवाई :- जीवती पोलिसांनी वाहनासह पकडली 7 लाख 44 हजार रूपयांची दारू

एकाला अटक तर दोघे आरोपी फरार !

जिवती प्रतिनिधी :-

तालुक्या लगत असलेल्या तेलंगणा राज्यातील केरामेरी येथून चुप्या मार्गाने अवैध दारूची तस्करी होत असल्याची माहिती जिवती पोलिसांना मिळताच शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या दरम्यान येसापुर-अंतापुर मार्गावर सापळा रचुन वाहनासह सात लाख 44 हजार पाचशे रूपयांची दारू जप्त करून एकास अटक केली आहे.

सर्वत्र कोरोना या आजाराने दहशत माजविली आहे.लगतच्या तेलंगणा राज्यातील जैनूर आणि वाकडी येथे कोरोनाचे पाॕझिटिव्ह रूग्ण मिळाल्याने प्रशासन वेळीच सतर्क होत संपूर्ण सिमा मार्ग बंद केले आहे.असे असतानाही अवैध दारूची तस्करी चुप्प्या मार्गाने होत असल्याची गुप्त माहिती जिवती पोलिसांना मिळताच सहा.पोलिस निरिक्षक विश्वास पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.शि.रमाकांत अमुगे,शैलेश दुर्गावाड,एकनाथ सुरनर यांनी येसापुर-अंतापुर या मार्गावर सापळा रचून 10 वाजताच्या दरम्यान एम एच-24 व्हि 6550 या अर्टिगा वाहनाची तपासणी केली असता मॕकडाल्स या कंपनीच्या 110 नग व वाहन असा एकुण सात लाख 44 हजार पाचशे रूपयांची अवैध दारू जप्त करून एकास अटक केली असून दोघे जण फरार असून तिघांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे