आ.सुधिरभाऊ मुनगंटीवार मित्रपरिवार तर्फे ४मे पासून रक्तदान शिबीर

आम सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवारचा उपक्रम

सैय्यद शफी यांनी रक्तदान करून केला वाढदिवस साजरा!

चंद्रपूर : येथील आय एम ए सभागृहात आम सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवार तर्फे स्वेच्छा रक्तदानाचा उपक्रम २एप्रिल पासून निरंतर सुरू होता.३२ व्या दिवशी , ३ मे रविवार ला आय एम ए सभागृहातील रक्तदानाचा समारोप चंद्रपुर वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांच्या अध्यक्षतेत करण्यात आला. विशेष म्हणजे गेले ३२ दिवसापासून लोकनेते आमदार सुधीर मुनगंटीवारांच्या कोरोना संकटातील मदतकार्याचे चित्रीकरण करणारे सैय्यद शफी यांनी रक्तदान करून वाढदिवस साजरा केला,यावेळी केक वितरित आला.सर्वांनी शफीचे कौतुक केले. विशेष म्हणजे यावेळी मित्र परिवारातील प्रकाश धारणे आणि डॉ मंगेश गुलवाड़े यांनी रक्तदान केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथॉलॉजि विभाग प्रमुख डॉ सवाई तुल, रक्तसंक्रमन अधिकारी डॉ अमित प्रेमचंद,डॉ झेबा निसार,उपमहापौर राहुल पावडे,आय एम ए अध्यक्ष डॉ किरण देशपांडे,रक्तदान प्रकल्प मुख्य संयोजक डॉ गुलवाडे,मित्र परिवारातील दत्तप्रसंन्न महादानी, प्रकाश धारणे, नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार,जी प सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांची मंचावर उपस्थिती होती.
प्रारंभी भारतमातेचे पूजन करून रक्तदानाला सुरवात करण्यात आली.प्रकाश धारणे,डॉ गुलवाडे यांचेसह सैय्यद शफीउद्दीन,विक्रांत देहारे,सुशीला पोरेड्डीवार,उत्तम राऊत,राहुल दळवी,मोहन तन्नीरवार,पृथ्वीराज दहिवले,स्नेहा गर्गेलवार, डॉ अमित प्रेमचंद यांनी रक्तदान केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना,डॉ एस इस मोरे म्हणाले,कोरोनाच्या संकटात रक्तदान करायला धाडस लागते.या धाडसमुळे अनेकांचा जीव वाचणार आहे..त्यामुळे रक्तदाते पण या युद्धात योद्धा आहेत. हे रक्त सिकलसेल व थायलेसिमियाच्या रुग्णांना दिले जात आहे. महाराष्ट्रात दुसरीकडे कुठंच असा उपक्रम सुरू नाही.आम मुनगंटीवारांच्या मित्र परिवारचे कौतुक करून त्यानी वैद्यकीय महाविद्यालय नेहमी सोबत राहील,असे आश्वासन दिले. जी.एम. सी.चे पुढेही सहकार्य राहीलअसे म्हणून त्यांनी आयोजकांना आश्वस्त केले.
राहुल पावडे यांनी प्रास्ताविकात ३१ दिवसाचा अहवाल सादर करीत हा असेउपक्रम आता,उद्या (४ मे) पासून जिल्हा सामान्य रुग्णालयात तील रक्तपेढि येथे स १० ते १२ वा यावेळात आम सुधीर मुनगंटीवार मित्र परिवारच्या स्वेछा रक्तदान उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणारे रक्तदाते रक्तदान करतील असे जाहीर केले.
डॉ गुलवाडे यांनी सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला.संचालन प्रशांत विघ्नेश्वर यानि केले तर सुभाष कासंगोट्टूवार यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी सूरज पेदुलवार,प्रज्वलन्त कडू,मयूर चहारे,रामकुमार आकापेलीवार ,विकास गोठे ,विनोद पातूरडे यांनी परिश्रम घेतले.रक्तसंकलनसाठी जयसिंग डोंगरे, पंकज भस्मे,अक्षय डहाळे यांनी महत्वाची भूमिका बाजावली.