ग्रामीण भागातील पोलिसांना आरोग्य सुरक्षा किटचे वितरण


कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन सुरू आहे, पोंभुर्णा आणि उमरी पोतदार येथील पोलीसांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्य सुरक्षा किट आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यातर्फे देण्यात आली. सर्व स्तरावर गरजवंतांना मदतीचा हात भेदभाव न करता आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. लॉकडाऊन चा ५२ वा दिवस असतांना त्यांचा मदतीचा ओघ सुरूच आहे. ही बाब प्रेरणादायी असून "आरोग्य सुरक्षा किट पोलिसांची तर पोलीस जनतेची सुरक्षा करेल, असे प्रतिपादन पोंभुर्णा पंचायत समितीच्‍या सभापती कु. अल्का आत्राम यांनी केले. त्या भारतीय जनता पार्टी चंद्रपुर जिल्हा तर्फे पोलीस स्टेशन पोंभुर्णा व उमरी पोतदार येथे आयोजित "आरोग्य तपासणी" उपक्रमात पोलिसांना संबोधित करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आज शुक्रवार (१५मे) ला बोलत होत्या. यावेळी पोंभुर्णा भाजपा तालुका अध्यक्ष गजानन गोरंटीवार, सहा.पोलीस निरीक्षक रवींद्र नाईकवाड, डॉ प्रतीक गोजे, भाजपा नेते डॉ मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे, पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अल्का आत्राम म्हणाल्या, कोरोना संकटात पोलीस जीवावर उदार होऊन, समोर येऊन लढा देत आहे, जनतेची सुरक्षा हेच त्‍यांचे प्रथम कर्तव्य आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्या दिवसापासून मदत कार्य सुरू केले.यापूर्वी पोलिसांना सॅनेटाईझर व मास्क दिले आणि आता आरोग्य सुरक्षा किट. त्यांचे हे कार्य जागरूक लोकप्रतिनिधी असण्याचे द्योतक आहे.
डॉ गुलवाडे म्हणाले, सरकारच्या पहिले या संकटाची गंभीरता लक्षात घेऊन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सूक्ष्म नियोजन करून, जनतेला सर्वतोपरी सहकार्य दिले, त्यात पोलिसांचे आरोग्य याचा समावेश आहे. ‘आरोग्य सुरक्षित, तर देश सुरक्षित, कोरोना हारेगा, देश जितेगा’ असा संदेश त्यांनी दिला. यावेळी प्रकाश धारणे, गजानन गोरंटीवार, सहा.पोलीस निरीक्षक रवींद्र नाईकवाड यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी संचालन रामकुमार आकापेलीवार तर पवन ढवळे यांनी आभार मानले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पोंभुर्णा येथील ३८ तर उमरी-पोतदार येथील १८ या प्रमाणे ५६ पोलीस कर्मचा-यांना "आरोग्य सुरक्षा किट" चे वितरण करण्यात आले. यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा चे डॉ गोजे, आरोग्य सेविक रोशना इटलावार, जयश्री तुम्मे, प्रमोद राठोड, यांनी अथक परिश्रम घेतले.