संपूर्ण विदर्भातील सर्वात मोठी रेती तस्करी भद्रावती तालुक्यात सध्या चर्चेचा विषय बनली असली तरी कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्या धाडसी कारवाई ने रेती माफियाची दणादण उडाली आहे. मात्र स्थानिक भद्रावती तहसीलदार शितोळे यांच्या संगनमताने काही ठिकाणचा रेती स्टॉक हलविण्यात रेती माफिया यशस्वी झाल्याची खळबळजनक माहीती समोर आली आहे . खरं तर पिंपरी, ढोरवासा, तेलवासा आणि चारगाव या परिसरात रेती माफिया वासुदेव ने आपले बस्तान बसवून त्या परिसरात जवळच्या नदीतून रेतीचा उपसा करून मोठ्या प्रमाणात साठवणूक केली होती, ही बाब हेरणाऱ्या व याचा विरोध करणाऱ्यांना सरळ ते मारण्याची धमकी देवून आपली दादागिरी त्यांनी चालवलेली असल्यामुळे कुणीच त्यांच्या या रेती तस्करी वर बोलायला तयार नाही. विशेष बाब म्हणजे तहसीलदार शितोळे यांच्यासोबत असलेले अर्थपूर्ण समंध व वेकोली प्रशासनाला मैनेज करून पोलिस प्रशासनाला जाणारी हप्ता पुंजी यामुळे वासुदेव चे कुणी काहीच बिघडवु शकणार नव्हते, मात्र बिचाऱ्या अनेक लहान ट्रक्टर चालक मालक यांना छोट्याशा रेती चोरीत सरळ सरळ तहसीलदार शितोळे दंड ठोठवायचे आणि ट्रक्टर तहसील कार्यालयात लावायचे मात्र वासुदेव च्या हायवा ट्रकनी मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होऊन सुद्धा त्यांच्यावर कुठलीही कारवाई तहसीलदार यांनी आजवर केली नाही त्यामुळेच तहसीलदार यांच्यावर कारवाई केल्यास खऱ्या रेती माफीयांचे बिंग फुटेल अशी चर्चा आहे. तहसीलदार यांच्या या भ्रष्ट कारभारामुळे जनहित समोर ठेवून बातम्यांची मालिका सुरू केल्यानंतर कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी पहिली कारवाई करून आपले मनसुबे जाहीर केले होते आणि त्यामुळेच रेती माफिया वासुदेव चे धाबे दणाणले. त्यानंतर कारवाईच्या भीतीने त्यांनी राजकीय लोकप्रतिनिधींना भेटी दिल्या खऱ्या पण लॉक डाऊन च्या काळात रेती चोरी हा गंभीर गुन्हा असल्याने त्यांना साथ मिळाली नसल्याने पत्रकारांना मारण्याच्या धमक्या काही त्यांच्या समर्थकांकडून मिळत आहे आणि जणू प्रशासन पैशाने विकल्या जाते अशा आविर्भावात ते वावरत असून दादागिरीची भाषा बोलत आहे. उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी या संदर्भात स्पष्ट संकेत दिले आहे की या रेती चोरी प्रकरणात कुणालाही आम्ही सोडणार नाही त्यामुळे आता रेती माफिया वासुदेव यांच्या रेती चोरी प्रकरणासोबतच कर्नाटका एम्टा कोळसा चोरी प्रकरणाची सुद्धा चौकशी होऊ शकते कारण त्यांच्या विट भट्टी परिसरात कर्नाटका एम्टा च्या कोळशाची चुरी पडून आहे, त्यामुळे उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्या आजच्या कारवाई ने नेमके या प्रकरणाला कोणते वळण मिळेल ? हे पाहणे औस्तूक्याचे ठरणार आहे.