राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट मुंबई व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल तर्फे डॉक्टर्संना "फेस शिल्ड (मास्क) चे वाटप

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट मुंबई व महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल तर्फे डॉक्टर्संना "फेस शिल्ड (मास्क) चे वाटप        
संपूर्ण भारतात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. शासकीय निर्देशानुसार संचार बंदीच्या नियमांचे पालन करून नागरिक घराबाहेर पडत नाही आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस विभाग अन्य सेवा देणारे कर्मचारीच फक्त आपला जीव धोक्यात टाकून या संकट समयी नागरिकांची सेवा करीत आहे. महत्वाचे म्हणजे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे डॉक्टरांचे फार मोठे योगदान या घडीला होत आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या ध्येयाला उराशी बाळगून सेवा देत असणाऱ्या चंद्रपूरातील डॉक्टर्सच्या चमूला राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट मुंबई व महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल तर्फे डॉक्टर्संना "फेस शिल्ड (मास्क) चे वितरण करण्यात आले.
 
इंडियन मेडिकल असो.चंद्रपूर चे पदाधिकारी डॉ.किरण देशपांडे, डॉ.मंगेश गुलवाडे, डॉ.नसरीन मावाणी यांचेकडे जिल्ह्यातील IMA शी संबंधित सर्व डॉक्टर्सना "फेस शिल्ड"( मास्क) वितरित करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील सर्व दंत चिकित्सकांना सुद्धा डॉ.मुंदडा व डॉ.गिरी यांच्याकडे "फेस - शिल्ड"(मास्क) सुपूर्द करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा सामान्य रुग्णालय व चंद्रपूर मेडिकल कॉलेज च्या स्टाफ ला सुद्धा हे "फेस शिल्ड"(मास्क) जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांचे कडे सोपविण्यात आले.
"फेस शिल्ड"(मास्क) वितरण प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.बाळकृष्ण भगत, शहर अध्यक्ष राजीव कक्कड,युवक प्रदेश पदाधिकारी सुनील दहेगावकर, सामाजिक सेलचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे इत्यादींची उपस्थिती होती.