एम. आय. डी. सी. तील श्री रासबिहारी अॅग्रो प्रोसेसर्स प्रा. लिमी. या कापूस जिनींग व प्रेसिंग कंपनीला अचानक आग लागल्याची घटना आज शनिवारी घडली. घटणेची माहिती होताच आमदार किशोर जोरगेवार यांनी कंपणीला भेट देवून परिस्थीतीची पाहणी केली. यावेळी या आगीचे कारण स्पष्ट नसल्याने याची योग्य चौकशी करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्यात.
आज सकाळी लागलेल्या आगीत या कंपणीतील लाखो रुपयांचे कापूस जळून खाक झाले आहे. घटणेची माहीती मिळताच अग्नीशमन दलाच्या वाहणांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले मात्र तोवर लाखो रुपयांचे नूकसाण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी एम.आय.डी.सी. परिसर गाठत कंपणीला भेट दिली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी संपूर्ण परिस्थीतीचा आढावा घेतला. या आगीमागचे कारण स्पष्ट करण्याच्या दिशेने पोलिस विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस विभागाला दिल्या आहे.