Lockdown मध्ये ही नागाळा-पडोली कोळसा टालावर कोळसा तस्करांचा सुरू होता कोळश्याचा काळाबाजार!


   Lockdown मध्ये संचार बंदीमुळे संपूर्ण वाहतूक बंद होती परंतु विज उत्पादनासाठी लागणारा कोळसा फक्त खाणींमधून पुरवठा होत होता,त्याच संधीचा फायदा घेत कोळसा तस्करांनी विज उत्पादनासाठी निघणार्या डिओवरच आपल्या टालवर चोरीचा कोळसा टाकत होते.संपुर्ण देश्यात लाॅकडाऊन करण्यात आले असतांनाही अशावेळी ही नागाळा-पडोली या कोळसा खाणीतून मोठ्या प्रमाणावर कोळसा तस्कर ट्रकांमधून कोळशाची उचल करून तो कोळसा नागाळा-पडोली येथील कोळसा टालावर जमा करून तोच चोरीचा कोळसा आत्ता जास्त किंमतीत बाजारात विकल्या जात आहे. हाती आलेल्या विश्वासनीय सूत्रानुसार लाॅकडाऊन दरम्यान आरटीओ कार्यालयाची वाहतुकीसाठी परवानगी घेण्याचे बंधन होते. चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून अशी परवानगी न घेता अनेक ट्रक मालकांनी ट्रकच्या दर्शनी भागात जीवनावश्यक वस्तू असा बोर्ड लावून कोळशाची मोठ्या प्रमाणावर चोरी केली. महत्वाचे म्हणजे पुढचा वाहतुकीसाठी लॉक डाऊन मध्ये फक्त पंधरा ट्रकांना परवानगी देण्यात आली होती.मात्र कोळसा तस्करांनी चोरीच्या कोळस्याचे ट्रक एकाच प्रमाणपत्राचे सत्यप्रती काढून ते दुसर्या ट्रकांना लावले गेले डी.आर.सी. व एम.के.सी. येथून कोळश्याने भरलेले ट्रक बाहेर काढण्यात आले व ते कोळशाने भरलेले ट्रक पडोली-नागाडा येथील त्याच कुप्रसिद्ध तस्करांच्या टालावर खाली करण्यात आले. कोळशाच्या तस्करीत माहिर असलेले हे कुप्रसिद्ध कोळसा तस्कर संपूर्ण देश आर्थिक रित्या ढासळला असताना वेकोली ला चुना लावून आपला चोरीच्या व्यवसाय जोमाने करीत होते. मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या अंधारात व पहाटे सुरू असलेल्या या व्यवहारात अनेक मोठे मासे सामील होते. काही दिवसापूर्वी पडोली काट्याजवळ चोरीने लपवून ठेवलेले कोळशाचे ट्रक रात्रीच्या अंधारात गुपचूपरित्या याच टालावर खाली करण्यात आले. याबद्दलची माहिती डी.आर.सी, एम.के.सी., पोलीस विभाग यांना देण्यात आली असून सदर प्रकरणाची वेकोलि प्रशासनाकडून लवकरच चौकशी सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. कोळसा तस्करीत सामील असलेले हे तस्कर या व्यवसायात चांगले रंगलेले आहे.
     काही महीण्यापुर्वी कोळसा व्यावसायिक कैलास अग्रवाल व इतर लोकांविरुद्ध अवैध कोळसा ट्रक मिळाल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले. कैलास अग्रवाल यांना त्यावेळी न्यायालयाने जमानतही दिली होती. त्यानंतर कोळसा चोरीचे प्रकरण थांबले नाही तर चेहरे बदलवून दुसऱ्या मोहऱ्यांनी यात हात घातला व हा व्यवसाय पहिले पेक्षा जोराने सुरू केला. त्यातीलचं एक मोहरा म्हणजे आशिष! कोळशाच्या व्यवसायात सोबतच अनेक उद्योगांमध्ये व्यवसाय असलेले हे बडे आसामी! नुकतेच यांच्यावर कोळशा शी संबंधित एक प्रकरण भोवले होते परंतु लेन-देन मध्ये माहीर असलेला हा आशिष यातून बचावला व आपला व्यवसाय कागदोपत्री हेराफेरीतून सुरू ठेवला आहे. पडोली आणि नागाडा या टालावर जमा होणारा कोळसा अशाच तस्करांच्या हेराफेरीतून होत आहे. कोळसा तस्करीचे पडोली व नागाडा हे हाॅटस्पॉट आहेत. पडोली-नागाडा टालावर अवैध कोळसा प्रकरण या तस्करांना चांगलेच भोवणार असून त्यांचेवर कायद्याचा बडगा उगारला जाणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे. "अभी जेल की सलाखे दूर नही." असा रंग आता दिसू लागला आहे. सर्व प्रकरण आता चांगलेच वळण घेतले असतांनाच  कोळसा तस्करीत जिल्हा वेकोली चे भ्रष्ट कर्मचारी-अधिकारी यांच्याशी हातमिळवणी करुन होत असलेल्या या कोळसा तस्करीत लाखो रुपयाची फिरौती वाटल्या जात असून सगळ्यांचे हात यात रंगले आहे त्यामुळेच कोळसा चोरी सर्रास सुरू आहे. "बकरे की माॅं कब तक खैर मनायेंगी", ही म्हण याच तस्करांवर फिट बसणारी आहे.