नाशीक जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे उत्कृष्ट कामगिरी



जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मा.प्रशांत वाघमारे (सर)यांच्या नेतृत्वाखाली या आपत्ती च्या काळात आपल्या पथकातील सर्व थरातील जवान हे लोकांच्या प्रति आपले कर्तव्य जाणून विविध प्रकारे लोकांच्या मदतीस धाऊन जात आहेत, कारण अशा कठिण समयी जनतेला साथ देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे हे ते जाणून आहे.

नाशिक येथील आपत्ती व्यवस्थापन व आपत्कालीन शोध व बचाव पथक नाशिक येथील,जाॅन भालेकर, नारायण मिरजकर,मंगेश केदारे, विशाल चौधरी ,मनोज कनोजिया,राहुल बोराडे,प्रवीण काळे,पंडित भगवान,विकास खैरनार,संकेत नेवकर व त्यांचे ईतर सर्व सहकारी हे नित्यनेमाने गरजूंना मोफत जेवणाची व्यवस्था करीत आहे, हे सर्व करतांना एवढे उत्कृष्ट व्यवस्थापन करून त्यांनी हे सेवा मागील 35 दिवस अविरतपणे चालू ठेऊन हजारो नागरिकांना दिलासा दिला आहे, याबद्दल या सर्वांचे खुप खुप अभिनंदन.

कोरोना विरुद्धची लढाई लढताना जीवनावश्यक वस्तू वेळेवर मिळणे ही सगळ्यात मोठी गरज आहे.
परंतु हातावर पोट असणाऱ्या अनेक गरजूंना ह्या वस्तू काम नसल्यामुळे विकत घेता येत नाहीयेत याच समस्येची जाणीव ठेवून या जवानांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला...🙏🙏🙏