"त्या"कोरोना बाधीत रुग्णाच्या नातेवाईकाच्या संपर्कामुळे अमरावतीत 50 जण कोरोनटाईन!



चंद्रपूर (कोरोना विशेष)
चंद्रपूर येथील कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाचा अमरावती येथील धामणगाव रेल्वे शहरातील नागरिकासोबत आलेल्या संपर्कामुळे अमरावती येथील धामणगाव रेल्वे येथे 50 जणांना होमटाईन करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. चंद्रपूर येथील पॉझिटिव असलेल्या रुग्णाच्या यवतमाळ येथील नातेवाईकांनी बुधवार दि. 13 मे रोजी धामणगाव रेल्वे शहरात मालवाहू वाहनाने प्रवेश केला होता. संबंधित व्यक्तीचे थ्रोड स्वॅप अहवाल यवतमाळ येथून प्राप्त व्हायचे असून या व्यक्तीला यवतमाळ येथे होमकोरोन टाईन करण्यात आले होते. परंतू तो आपले चार चाकी वाहन घेऊन अमरावती येथे गेल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या जवळपास 50 लोकांना होमकोरोनटाईन केले असल्याच्या माहितीला धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक महेश साबळे यांनी दुजोरा दिला आहे.
चंद्रपूर बिनबा परिसरातील एक कुटुंब यवतमाळ येथील आपल्या नातेवाईकांकडे काही दिवस मुक्कामी होते. तेथून परवानगी घेऊन आल्यानंतर त्या कुटुंबातील एक मुलगी चंद्रपूर येथे पॉझिटिव निघाल्यानंतर एकच खळबळ माजली होती. नुकतेच त्या कुटुंबातील सदस्यांचे नमुने निगेटिव्ह आले असले तरीही ज्या नातेवाईकाकडे ही मुलगी मुक्कामी होती, तो व्यक्तीं मालवाहू वाहनांचा चालक असल्याने या व्यक्तीने आपल्या वाहनाने धामणगाव रेल्वे (अमरावती) शहरात प्रवेश केला होता. चंद्रपूर येथील रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाल्यानंतर बुधवार 13 मे रोजी हा इसम आपले मालवाहू वाहन घेऊन धामणगाव शहरात प्रवेश केला होता. त्याच्या वाहनातून सामान उतरविणारे व संपर्कात आलेल्या जवळपास पन्नास लोकांना होम तथा सेल्फ कोरोनटाईन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे चंद्रपुरातील त्या बाधित रूग्णाचे नातेवाईक व जवळच्या संपर्कातील सगळेच अहवाल गूरूवार दि. 14 में रोजी निगेटिव आल्यामुळे चंद्रपूरकरांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

अनेक ठिकाणी "होम-कोरोनटाईन" असलेले दिशा निर्देशांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले असल्यामुळे ज्यांना असे व्यक्ती बाहेर फिरतांना आढळतात त्यांनी आरोग्य विभागाला याची सूचना द्यावी, यानंतर अशा बेजबाबदारी करणाऱ्यांना दंड आकारला जाऊन त्यांचेवर गुन्हा ही दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी नुकतीच प्रतिनिधींना दिली होती.