जिवती,नागभिड व सिंदेवाहीच्या शासकिय गोदामात धान्याची केली जाते अफरातफरी !


गोदाम किपर 1500 रू. क्वि. च्या दराने बाहेर विकतात अन्नधान्य!

चंद्रपूर : गोरगरिबांना गहू तांदूळ मिळावे यासाठी शासन मोठ्या स्तरावर प्रयत्न करीत आहे परंतु गरिबाच्या वाट्याला येणारे हे अन्न खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. येथील शासकिय गोदाम मधील गोदाम कीपर राशन धान्य राशन दुकानदारांना देताना त्यातून काही धान्य काढून ठेवले जाते व ते नंतर 1500 रुपये क्विंटल च्या दराने खुल्या बाजारात विकला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. सिंदेवाही व नागभिड येथे शासकीय गोदाम आहेत. त्या-त्या तालुक्यातील ठिकाणी अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी याठिकाणी शासकीय धान्य साठविली जाते यानंतर ते धान्य रेशन दुकानदारांना निर्धारित केलेल्या प्रमाणात वितरित करण्यात येते. हे धान्य जिवती,नागभिड,सिंदेवाही येथील गोदाम किपर राशन दुकानदारांना देताना ते वजनापेक्षा कमी देतात. यासंदर्भात राशन दुकानदार यांनी विचारणा केली असता वरिष्ठ स्तरापर्यंत याची माहिती आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे रेशन दुकानदारांना दिली जातात. यासंदर्भात सोमवार दिनांक 11 मे रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्रजी मिस्कीन यांना तक्रार देण्यात आली असून काय कारवाई होते याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
शासनाच्या वतीने गरीबांना स्वस्त दरात अन्नधान्य पुरवठा केला जातो. प्रत्येक राशनकार्ड धारकांना युनीटनुसार व अंत्योदय, बि.पी.एल. अश्या प्रमाणे वाटप केल्या जाते. सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे.जगभरात लाॅकडाऊन केला गेला आहे.त्यामुळे सामान्य जनतेचा रोजगार बंद असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.या परीस्थीतीला मात करण्यासाठी केद्र सरकारने सर्व जनतेला तिन महीण्यापर्यंत अन्यधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र काही भ्रष्ट अधिकार्यामुळे अश्या लोकाभिमुख योजना बासनात गुंडाळला जात आहे.गरीबांना भेटणारे अन्नधान्यावर डोळा ठेवून गरीबांना उपाशी ठेवण्याचेे काम असे अधिकारी करीत आहेत.यापुर्वी शासकिय अन्नधान्यात वाटपात करतांना भ्रष्टाचार होत होता.त्यामुळे शासनाने आॅनआईन पध्दतीने अन्यधान्य वाटप सूरू केले आहे.त्यातून भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी हा प्रयत्न होता. परंतु आता भ्रष्टाचार जास्त होत असल्याचे व ते वेगळ्या मार्गाने केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. जिवती,सिंदेवाही नागभिड येथे होणाऱ्या भोंगळ कारभारावर पुरवठा अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी या क्षेत्रातील रेशन दुकानदारांकडून होत आहे.