शेतातील कृषी पंपाच्या वीज पुरवठ्याची कामे त्वरित सुरु करा : खासदार बाळू धानोरकर

शेतातील कृषी पंपाच्या वीज पुरवठ्याची कामे त्वरित सुरु करा : खासदार बाळू धानोरकर


चंद्रपूर : शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटात होळपळत असतो. अनेकदा शेतकरी शासनाच्या लाल फितील अडकलेल्या निर्णयाच्या अंमलबाजवणी मुळे त्यांचे नुकसान झाल्याचे दिसून येते. अशाच एक निर्णयावर शासकीय अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कामामुळे शेतकरी हैराण झाला असून जिल्ह्यातील रखडलेल्या कृषी पंपाच्या वीज पुरवठ्याची कामे करण्याची परवानगी देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना केली आहे.
जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी महावितरण कंपनी तर्फे ३१ मार्च २०१८ रोजी कृषी पंप साठी डिमांड भरलेली होती. परंतु कृषी पंपाच्या वीज पुरवठ्याची कामे अद्याप पूर्ण झालेली नाही. सादर कामे एक महिन्याच्या कालावधी पुरती शिल्लक आहे. मान्सून सुरु झाल्यानंतर सदर कामे सुरु होऊ शकत नाही. शेतकरी देखील कृषी पंपाला वीज पुरवठा मिळण्यापासून वंचित राहील. त्यामुळे दोन वर्ष लोटून देखील शेतकऱ्यांना कृषी पंपाला वीज पुरवठा अद्याप जोडलेले नाही हि खेदजनक बाब असल्याची नाराजी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या जवळ व्यक्त करीत जिल्ह्यातील रखडलेल्या कृषी पंपाच्या वीज पुरवठ्याची कामे सुरु करण्याची परवानगी देण्याची विनंती त्यांनी केली. या निर्णयानंतर जिल्हातीलहजारो शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.