▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

चंद्रपूर ग्रिन झोनमध्ये असतांनाही शासनाच्या यादीत आॅरेंज झोन कसे जनतेत संभ्रम

चंद्रपूर ग्रिन झोनमध्ये असतांनाही शासनाच्या यादीत आॅरेंज झोन कसे जनतेत संभ्रम

पालकमंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हाधिकारी खेमनार यांनी दखल घेवून शासनाच्या रेकॉर्ड मधे दुरस्ती करावी, अशी जनतेची मागणी !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

संपूर्ण जगात कोरोना संकटाच्या महामारीत माणसे लाखोंच्या संख्येत मरत असतांना महाराष्ट्रात सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत घट येतांना दिसत नाही तर उलट लॉक डाऊन च्या काळात सुद्धा ती संख्या वाढत आहे. यामुळे आता लॉक डाऊन कधी खूलेल या विवंचनेत माणूस घरी बसून जणू मानसिक रुग्ण व्हायला लागला आहे. परंतु महाराष्ट्रातील खनिज संपदा असलेला महत्वाचा जिल्हा म्हणून चंद्रपूर सद्ध्या ग्रीन झोन मधे असला तरी तो शासनाच्या कोविड 19 च्या वेब साईड वर ऑरेंज झोन मधे असल्याचे दाखविण्यात येत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला आता आपला लॉक डाऊन संपेल की नाही ? हा प्रश्न त्रस्त करीत आहे . कारण मागील चाळीस दिवसापासून घरी राहून आर्थिक नुकसान झेलनाऱ्या गरीब श्रमजीवी जनतेला आता अधिक कुणाचे फुकटात मिळालेले भोजन किंव्हा धान्य घेवून फोटोत आपली लाचारी झेलण्याची ताकत राहिलेली नाही आणि जे अन्नधान्य किंव्हा भोजन देत आहे त्यांची फोटो काढण्याची आता सुद्धा आदत गेलेली दिसत नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात लॉक डाऊन खोलन्यात यावं आणि संपूर्ण कामकाज जिल्ह्यांअंतर्गत सुरू व्हावं अशी सर्वांची अपेक्षा आहे आणि खरं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं होतंच की आता अर्थचक्र फिरायला हवं त्यामुळे चंद्रपूर जिल्हा त्या द्रुष्टीने अतिशय महत्वपूर्ण असून महाराष्ट्रच्या वीज निर्मिती क्षेत्रात अग्रगण्य जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.

चंद्रपूर जिल्हा हा ग्रीन झोन मधे आहे अशी नेहमीच प्रसारमाध्यमांसमोर बोलताना जिल्हाधिकारी कुणाल खेमनार ग्वाही देतात आणि ही वस्तुस्थिती सुद्धा आहे, पण नागपूर येथे इंडोनेशिया या देशातून आलेल्या एका चंद्रपूर च्या जोडप्याला कोरोना झाला होता आणि मागील अनेक दिवस ते कोरोणाशी लढत असतांना आता ते बरे झाले अशी माहीती प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केली होती.आणि विशेष म्हणजे ते दोन्ही कोरोना रुग्ण जरी चंद्रपूर चे रहिवाशी होते तरी कोरोना झाल्यावर ते त्यानंतर चंद्रपूर ला आले नव्हते अर्थात त्यांचा संसर्ग चंद्रपूर जिल्ह्यात झाला नाही. मग तरीही शासनाच्या कोविड-१९ या वेब साईड वर अजूनही चंद्रपूर जिल्हा हा ऑरेंज झोन मधे दाखवते कसा ? हा प्रश्न निर्माण होतं असतांना, जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी याबाबत काय सुधारणा केली ? याबाबत जनतेला सांगणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे काही पत्रकार कुठलीही शहानिशा न करता चंद्रपूर जिल्ह्यातील काही रुग्णांचा संदर्भ घेत चुकीची माहीती प्रकाशित करून जनतेत भ्रम निर्माण करतात जे या गंभीर स्थितीत योग्य नाही, अर्थातच आता चंद्रपूर जिल्हा हा ग्रीन झोन मधे आहे , कारण इथे कोरोना चे कुठलेही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. परंतु शासनाच्या वेब साईड वर ज्यामध्ये नेहमी चंद्रपूर ला ऑरेंज झोन मधे दाखवून जिल्ह्यातील जनतेत संभ्रम निर्माण होतं आहे तो संभ्रम कधी दूर होणार ? याबाबत उलटसुलट चर्चा रंगत आहे. त्यामुळे तो संभ्रम पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी दूर करावा अशी मागणी आता जोरात होऊ लागली आहे .