अल्पावधीतचं "चंद्रपूर क्रांती" चे वाचक 1 लाख पार!
आज शनिवार दि. ३० मे रोजी एक लाखापेक्षा (१,०४,४७८) जास्त विश्वासाची वाचक संख्या "चंद्रपुर क्रांती" या blog ने पुर्ण केली आहे, यात आपले ही योगदान आहेच, म्हणूनचं सर्वप्रथम आपले आभार!

रविवार दि. २९ मार्च २०२० पत्रकार मित्र मंडळी सोबत बसलो असताना काही मित्र मंडळींनी पोर्टल सुरू करण्याचा सल्ला दिला. क्षणाचा ही विलंब न करता माझे मित्र देवनाथ गडांटे यांचे सहकार्याने हा blog निर्मीत करण्यात आला, त्याला आज याचा ६० वा दिवस पुर्ण होत आहे. संचारबंदीच्या काळात एकाएकी हा blog साकारला, पत्रकार व साप्ताहिक वृत्तपत्र " चंद्रपुर क्रांती" चे संपादक या नात्याने अनेकांशी आलेला संबंध बघता मोबाईल च्या माध्यमातून विश्वासाचे नाते वाचकांशी स्थापित व्हावे व आधुनिक पत्रकारितेची जोड साधता या माध्यमातून साधता आली. सन २०११ मध्ये साप्ता. चंद्रपूर क्रांती ची नोंदणी करण्यात आली. मागील काही वर्षांपासून नियमितपणे आम्ही वाचकांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी ही झालो होतो.
प्रिय वाचकांमध्ये विश्वासाचे स्थान निर्माण करण्यात अल्पावधीतचं यश मिळाले. आज अवघ्या ६० दिवसात एक लाख चार हजार चारशे अठ्याहत्तर पेक्षा जास्त झाला आहे.

वाचक म्हणून आपण आमचेवर दाखविलेले प्रेम आम्ही कधिही विसरणार नाही. आपण आमच्यावर विश्वास दाखविला. आज एक लाखापेक्षाही जास्त विश्वासाचा वाचक वर्गामध्ये आपलाही सिंहाचा वाटा आहे, यासाठी पुनश्च एकदा आपले आभार !