शहरात अस्वलीचा वावर, बंगाली कॅम्प मध्यून केले जेरबंद

चंद्रपुर प्रतिनिधी:-काल रात्रि 12:30 च्या दरम्यान एक अस्वल चंद्रपूर शहरात सर्वत्र फिरत असल्याचे विविध भागातील नागरिकांनीत चर्चा असल्याचे इको प्रो संस्थेच्या ध्यानात आले असता, सुरुवातीला जटपुरा गेट परिसरात दिसलेली अस्वल शेवटी मूल रोडवरील सिएचएल हॉस्पिटल च्या मागील परिसरातून जेरबंद करण्यात आले.

विविध भागातील नागरिकांनी दिलेल्या माहिती नुसार काल रात्री 12:30-1 च्या आसपास सुरुवातीला जटपुरा गेट परिसरातून अस्वलीला फिरताना काही नागरिकांनी बघितले त्यानंतर रेलवे स्टेशन,कलेक्टर आफिस ते बंगाली मूल रोड वरील एमएसइबी ऑफिस परिसरात ही अस्वल भ्रमंती करीत असल्याचे अनेकांनी इको प्रो ला माहिती देताच त्यांनी वनविभागाला पाचारण करन शेवटी आज सकाळी सिएचएल हॉस्पिटल च्या मागील परिसरातून जेरबंद करण्यात आले.

एरव्ही चंद्रपूर शहर व लगतच्या परिसरात वन्य प्राण्यांनी मुक्त संचार करणे नेहमीचे झाले असून गेल्या काही महिन्यात अनेक वेळा अस्वली आपल्या पिलांसहित शहरात फिरत असताना आढळ्यास आहेत. असेच काही दिवसापूर्वी नागपूर रोड वरील संजय गांधी ला अस्वलीचे पिल्ला सोबत फिरताना आढळले तर बालाजी वॉर्ड परिसरातून सुद्धा अस्वल जेरबंद करण्यात आली होती.