*तेलंगणातील दारु पोहचली "गडचांदूरात* पोलीस स्टेशन समोरच विकल्या गेली दारू

पो.स्टे. च्या नाकासमोर मद्यशौकीनांनी केली गर्दी, अधिकारी मात्र झोोपेत
 
      

 
गडचांदूर (प्रति.) : गुरुवार दिनांक 6 मे रोजी गडचांदुर मधील मद्य शौकिन "तर्र" झालेत. संचारबंदी नंतर पहिल्यांदाच गडचांदूर मध्ये तेलंगाना येथील विदेशी दारू मोठ्या प्रमाणात पुरवठा झाली. शहरातील मुख्य ठिकाणी त्याची विक्री झाली. तळीरामांना जसजशी ही माहिती मिळाली तसतशी त्या ठिकाणी गर्दी जमा होऊ लागली, महत्वाचे म्हणजे गडचांदूर पोलीस स्टेशनच्या अगदी समोर नेहमीच्या ठिकाणांवर ही दारू विक्री होत होती, परंतु गडचांदूर चे पोलिस अधिकारी मात्र झोपेत असल्याचे सोंग घेऊन उगे-मुगे होते.                                  
 
नोंद करण्यालायक बाब म्हणजे विरूर पोलिसांनी आज तेलंगाना येथून येणारा दहा लाखाचा सुगंधित तंबाखूवर कारवाई केली. संचारबंदीचा ताण त्यांना ही आहे, कर्तव्यात कसूर नाही याचे हे जिवंत उदाहरण आहे आणि गडचांदूर मध्ये मात्र पोलिसांच्या नाकावर नींबू टिच्चून अगदी पोलिस स्टेशनसमोर तळीराम आपली हौस पूर्ण करत असतांना गडचांदूर पोलिसांचे नायक गोपाल भारती यांचे याकडे कसे काय लक्ष गेले नाही, ही बाब गंभीर आहे. फक्त याच भागात नाही तर प्रभाग क्रमांक 8, प्रभाग 4 आदि अवैध दारू विक्री पुर्वी ज्या ठिकाणी  विदेशी दारू मिळायची त्याठिकाणी आज तळीरामांना आपली हौस भागवली. मिळालेल्या वृत्तानुसार आज तेलंगाना येथून फार मोठा दारूसाठा गडचांदूर शहरामध्ये आणण्यात-पोहोचविण्यात आला. गडचांदूर चे पोलीस निरीक्षक गोपाल भारती व त्यांची टीम यावेळी काय करत होती, हा विषय मात्र अभ्यासाचा आहे. तेलंगाना बॉर्डर ला लागून असलेले सगळ्यात मोठे शहर गडचांदूर हेच आहे. चोर रस्त्याने तेलंगणावरून गडचांदूर ला यायला जास्त अवधी लागत नाही. यापूर्वी चार वर्षांचा अनुभव बघता प्रत्येक चोर रस्ते हे गडचांदुर पोलिसांच्या नजरेत आहेत, मग आज या ठिकाणाहून दारूचा पुरवठा होत असतांना गडचांदूर पोलीस व त्याचे प्रमुख गोपाल भारती मुंग गिळून कसे राहिले? अगदी पोलिस स्टेशन समोर दारू विक्री होत असतांना कुणाच्याही कसे नजरेत आले नाही की सारेजण फक्त संचारबंदीच्या कामासाठी मग्न आहेत असा प्रश्नच गडचांदूर चे सुज्ञ नागरिक आज विचारू लागले आहेत. गडचांदूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार व पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी त्वरित या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

राज्य सरकारने संचारबंदी नंतर महाराष्ट्रात दारूची दुकाने सुरू करण्याच्या निर्णय घेतल्यानंतर दारू दुकानांसमोर लागलेली "कतार" डोकेदुखी ठरत आहे. शासन नियमाचे खुलेआम उल्लंघन होत असल्याने दारूची दुकाने उघडण्यासाठी दिलेली परवानगी हा निर्णय चुकीचा तर नाही नां! यावर सगळीकडे वावडे उठत आहेत.

    एक बाेतल शराब के लिए,
    कतार मे जिंदगी लेकर खडा हाे गया |
    माैत का डर ताे वहम था, 
    आज नशा जिंदगी से बडा हाे गया |

अशी स्थिती आज राज्यात दारू सुरु केल्यानंतर झाली आहे. सोशल डिस्टन्सिग व कोरोनाबद्दल ची भिती चा दारू सुरू झाल्यानंतर फज्जा उडाला आहे. चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या दारूबंदीचा जिल्ह्यात दारू आणण्यासाठी दारू तस्कर विविध मार्ग शोधत होते. तेलंगाना मधून मोठ्या प्रमाणावर चंद्रपूर जिल्ह्यात दारूचा पुरवठा होत असतो. संचारबंदी नंतर पहिल्यांदाच गडचांदूर येथे पहिल्यांदाच आलेली दारूची ही "खेप" प्रारंभाची धोक्याची घंटा राहू शकते, तेलंगाना येथील कोरोना ची स्थिती बघता यावर "रोख" आणण्याची जबाबदारी असलेली पो.नि. गोपाल भारती यांची टीम चा कारभार हा पुर्वीपासून संशयास्पद असल्यामुळे याकडे पोलिस अधीक्षकांनी स्वत: जातीने लक्ष द्यावे, अशी गडचांदूरवासीयांची मागणी आहे.