मुल न.प. प्रशासनातर्फे नालेसफाईचे कामाला सुरूवात!
आम. मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार व नगराध्यक्षा सौ. भोयर यांच्या उपस्थितीत पावसाळ्यापुर्वीचे नालेसफाईचे नियोजन व आराखडा तयार


(मुल वार्ता) : जिल्हा प्रशासन चंद्रपूर तसेच बल्लारपूर क्षेत्राचे आमदार, माजी वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार पावसाळ्यापूर्वी चे नालेसफाईचे नियोजन व आराखडा तयार करून मूल नगर प्रशासानाद्वारे वार्डात कामे सुरू करण्यात आले. प्राध्यापक रत्नमाला भोयर तसेच मुख्याधिकारी विजय सरनाईक यांच्या नेतृत्वात नगर प्रशासनाचे आरोग्य विभागातील कर्मचारी लाकडाऊन च्या काळातही कार्यतत्पर राहून आपले कर्तव्य बजावत आहे व नागरिकांच्या समस्या सोडवत आहेत. प्रत्यक्ष नगराध्यक्षा सौ. रत्नमाला भोयर वार्ड क्रमांक १४ येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेत व स्थळाला भेट देत कामे करून घेतली. वार्डातील रहिवासी देशमुख सर. मोडक सर आदिंनी नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांचे आभार मानले आहे.

मे महिन्यात रोहिणी नक्षत्र रोहिणी सुरू झाले की पावसाची सुरुवात होते परंतु यावर्षी व 2019 या वर्षापासून पावसाने सतत पाठपुरावा केल्याने लोकांना नाकीनऊ आणले त्यातून सावरत असतानाच कोरूना ने जगाला विषाणूच्या विळखा घातला स्वतःचे त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पण त्यातही नगर प्रशासन आपले नियोजित कामे करण्यास तत्पर आहे. पावसाळ्यापूर्वी ची नाली सफाई व अडकलेले पाणी निघून जावे यासाठी स्वतः उपस्थित राहून नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी वार्डवासीय जनतेची समस्या सोडविली.