बंदी असलेला सुगंधीत तंबाखू विकणाऱ्या त्या "सुखलाल"वर कारवाईचे संकेत!चंद्रपूर : बंदी असलेल्या सुगंधीत तंबाखूचा भर वस्तीमध्ये होलसेल व्यापार करणाऱ्या त्या "सुखलाल"वर आता कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहे. शहरातील भर वस्तीमध्ये आपला होलसेल व्यापार थाटणारा व्यापाराचे साप्ताहिक "चंद्रपूर क्रांती" च्या पोर्टल वर नुकतीच "पोल-खोल" करण्यात आली होती. बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू ची भेसळ करून जिल्ह्यामध्ये पुरवठा करणारा त्या व्यापाराचे आता वाभाडे निघणार असून यासंबंधातील वृत्त प्रकाशित झाल्यानंतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः संपर्क साधून पोर्टल चे संपादकांना यासंबंधात अधिकची सविस्तर माहिती देवून अधिकृत तक्रार देण्याचे आवाहन केले आहे. महत्वाचे म्हणजे प्रकाशित झालेल्या या वृत्तामध्ये या व्यापाराच्या व्यवसायाची सविस्तर व सखोल माहिती प्रकाशित झाल्यामुळे नागपूर येथील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संबंधात तातडीने पावले उचलल्याचे समजते. सदर वृत्त प्रकाशित होता क्षणी हे वृत्त दोन तासाच्या आतच 3000 च्या जवळपास लोकांनी बघितले. एका प्रामाणिक व सुज्ञ लोकप्रतिनीधी ने सदर वृत्त नागपूरच्या प्रादेशिक कार्यालयाला पाठवुन, त्यासंबंधात जागरूकता दाखविल्याचे कळते. त्यामुळेचं या वृत्ताची जिल्हास्तरावर गंभीर दखल घेण्यात आली असून याविषयी अधिकृत तक्रारीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार असुन त्या "सुख "लाल" वर कारवाई चे संकेत मिळाले आहे.