अबब...!!! ऐकावं ते नवलचं...!
संचारबंदीमुळे सगळेच आपापल्या घरी आहेत असेच एखादी अफवा फार मोठ्या स्तरावर पसरवली जाते, सध्या जिल्ह्यात मिठ कमतरतेने जोर पकडला आहे. जेवणामध्ये खाण्याच्या मीठाचा येणारा काळात तुटवडा पडणार आहे, या अफवेने काही जणांनी एका मोठ्या स्तरावर साठा करून तो विक्री करण्याच्या उद्योगाला सुरुवात केली आहे. ही अफवा एवढ्या मोठ्या स्तरावर पसरली आहे की शेजारच्या तेलंगाना राज्यात हे मिठ चढल्या दराने लोक विकत घेत आहेत.
याच्या चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत येत आहे. संचारबंदीमध्ये सर्व सामान्य कामे सुरळीत सुरू असतानाच आज सकाळला जिल्हा वासियांनी मिठाचे पुढे जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी करण्याचा सपाटा लावला, तो पण तीन-चार पट दराने विकत घेतल्या जात होता. ही बाब अनेकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबद्दल चौकशी केली असता हा नवल वाटणारा प्रकार त्यांच्या लक्षात आला. अनेकांनी त्वरित ग्रामपंचायत कर्मचारी यांना गावात माईक घेऊन असा काहीचं तुटवडा पडला नसल्याची गावात दवंडी फिरवायला लावली. व ही अफवा असून यावर बिलकुल विश्वास करू नये, शासनाचे या संदर्भात कोणतेही निर्देश आले नसल्याचे गावकऱ्यांना पटवून सांगितले. हा प्रकार थोडा बहुत थांबला. याबाबत चौकशी केली असता सदर प्रकार हा जिल्ह्यात अनेक छोट्या-मोठ्या ठिकाणी सुरू असून मिठाची मोठ्या प्रमाणावर खरेदी करून त्याच्या साठा घरामध्ये ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले. शेजारच्या तेलंगाना राज्यातील काही गावामध्ये या अफवेने जोर पकडल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच राज्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या भरपूर साठा असल्याचे घोषणा केली होती तरीही विना कारणच्या अफवांमुळे बेजार होऊन जाण्याचे कारण नाही, असे या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. मीठा चा तुटवडा हा तर "ऐकावे ते नवलचं" असा प्रकार आहे.