दिनांक 31 मे हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती दिवस. हा जयंती दिवस भाजपतर्फे चंद्रपूर जिल्ह्यात सेवादिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.. या सेवादिनाचे औचित्य साधुन भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे प्रत्येक तालुका स्तरावर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.
दिनांक 31 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 वा. दरम्यान चंद्रपूर शहरासह जिल्हयातील सर्व शहरांमध्ये तसेच तालुका मुख्यालयी रक्तदान शिबीर आयोजित करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली देण्यात येणार आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतुन हे रक्तदान शिबीर आयोजित होत आहे. भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मार्चा आणि भाजपा महिला आघाडी यांच्या माध्यमातुन जिल्हाभर हे रक्तदान शिबीर संपन्न होणार आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. हा तुटवडा दूर करण्याच्या दृष्टीने हे रक्तदान शिबीर सेवा म्हणून आयोजित करण्यात येत आहे. हे रक्तदान शिबीर सोशल डिस्टंसींग पाळून करण्यात येणार आहे.
या रक्तदान शिबीरात नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे व रक्तदान करावे, असे आवाहन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, आ. किर्तीकुमार भांगडीया, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे, प्रा. अतुल देशकर, संजय गजपूरे, राजेश मून, राहूल सराफ, ब्रिजभूषण पाझारे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. रेणुका दुधे, चंद्रपूरच्या महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, बल्लारपूर च्या उप नगराध्यक्षा सौ. मिना चौधरी, काशी सिंह, पोंभुर्णा पंचायत समितीच्या सभापती अलका आत्राम, उपसभापती ज्योती बुरांडे, गजानन गोरंटीवार, राहूल संतोषवार, नगराध्यक्षा श्वेता वनकर, उपनगराध्यक्षा रजिया कुरैशी, मुलच्या नगराध्यक्षा सौ. रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे, बल्लारपूर तालुकाध्यक्ष किशोर पंदिलवार, सावली तालुकाध्यक्ष अविनाश पाल, चंद्रपूर तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, नामदेव डाहूले, सिंदेवाही तालुकाध्यक्ष राजू बोरकर, वरोरा तालुकाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, वरोरा शहर अध्यक्ष सुरेश महाजन, भ्द्रावती शहर अध्यक्ष प्रविण सातपुते, भद्रावती तालुकाध्यक्ष तुळशिराम श्रीरामे, जिवती तालुकाध्यक्ष केशवराव गिरमाजी, गोंडपिपरी तालुकाध्यक्ष बबनराव निकोड, राजुरा तालुकाध्यक्ष सुनिल उरकुडे, नागभीड तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम, चिमूर तालुकाध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर यांच्यासह जिल्हयातील सर्व भाजपा पदाधिका-यांनी केले आहे.