राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीचे औचित्य साधून भाजपाचे रक्तदान शिबीरराजमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्य जिल्ह्यात उद्या (३१ मे )रविवार ला विविध ठिकाणी स.८ ते १२ दरम्यान रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आले आहे.कोविड १९ या महामारीचे संकट लक्षात घेता,सामाजिक अंतर राखून व इतर नियमांचे पालन करून कार्यकर्त्यांनी रक्तदान करावे व हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन लोकनेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्मदिन सेवादिन म्हणून साजरा केला जातो. भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यानी या दिवशी रक्तदान करून राजमाता अहिल्याबाई होळकर यांना आदरांजली अर्पण करावी अशी सूचना प्रदेश भाजपाने केल्याने जिल्ह्यात हा उपक्रम घेतला जात आहे.विशेष म्हणजे यापूर्वी आमदार मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार २एप्रिल ते ६ मे दरम्यान रक्तदान शिबिर घेण्यात आले होते.ज्याचा लाभ सिकलसेल व थायलेसेमिया ग्रस्ताना झाला.
उद्या भाजप कार्यकर्ते चंद्रपुर ,पडोली दुर्गापूर,वरोरा बल्लारपूर,राजुरा,जीवती, मूल, पोंभुरणा,सिंदेवाही,येथे रक्तदान करणार असून चंद्रपुर शासकीय वैद्यकीय महाविद्यालायची चमू रक्त संकलन करणार आहे.
ब्रह्मपुरी,सावली येथे गडचिरोली येथील शासकीय रुग्णालयातील चमू तर चिमूर,नागभीड येथे डॉ हेडगेवार रक्तपेढी (नागपूर) रक्तसंकलन करणार आहे.भाजपा-भाजयुमो कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुक्यात रक्तदान करावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केले आहे.
जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी व्हावा म्हणून भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे,उपमहापौर राहुल पावडे, नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार,रक्तदान प्रकल्प संयोजक डॉ मंगेश गुलवाडे,प्रकाश धारणे,दत्तप्रसंन्न महादानी,सुरज पेदुलवार,प्रज्वलन्त कडू,उज्जल धामनगे,प्रशांत विघ्नेश्वर यांचे सह सर्व भाजपा तालुका अध्यक्ष,पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.