सबसिडीच्या कोळश्याचे लपवून ठेवलेले कोळस्याचे ट्रक पडोलीच्या टालावर झाले खाली


कोळसा तस्करांच्या "आशिष" प्राप्त वेकोली अधिकार्यांच्या व तस्करांची चौकशीची मागणी

चंद्रपूर प्रतिनिधी : नुकताच फेब्रुवारी महिन्यात कैलास अग्रवाल यांच्या कोळसा टालावर पोलीसांनी धाड टाकली होती. त्यात बेकायदेशीर कोळश्याने भरलेले ट्रक जप्त करण्यात आले होते. त्यानंतरही कोळसा तस्करांनी आपली तस्करी थांबवली नाही. हे प्रकरण ताजे असतानाच उद्योगांना जाणारा सबसिडीचा कोळसा ३१ मार्चनंतर नागपूर मार्गावर लपवून ठेवलेला पडोली येथे खाली करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे दि. १ ते ६ एप्रिल पर्यंत डीआरसी मधून कोणतेच डीओ काढण्यात आले नाही, मग हा चोरीचा कोळसा रात्रोच्या अंधारात पडोलीला कोठे वकसा खाली करण्यात आला व या चोरी प्रकरणात कुणाचा "आशिष" प्राप्त आहे, हा तपासाचा विषय आहे.

सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर आणि वणी वेकोली क्षेत्रातून लघू व मध्यम उद्योगांना सबसिडी चा कोळसा देण्यात येतो. हा सबसिडीचा कोळसा ज्या नावे डिओ असेल तिथेच पाठविणे गरजेचे आहे. मात्र ३१ मार्च रोजी चंद्रपूरातील दुर्गापूर रय्यतवारी काॅलरी व महाकाली काॅलरी या भुमीगत खदानीतून काठीयावाड कोल अॅड कोक व गूजरात कोल अॅड कोक यांचे नावे डिओ होते. आणि ३१मार्च हे कोळसा उचलण्याची शेवटची तारीख होती. त्या प्रमाणे वेकोलीतून हा कोळसा उचलण्यात आले. हा सबसिडीचा कोळसा ज्या कंपनीत पाठविणे आवश्यक होते, मात्र ते कोळसाने भरलेले ट्रक तिथे न पाठविता पडोलीच्या टालावर रातोरात पोहचता झाला.
ट्रक खाली करण्यासाठी पाहत होते संधी ! कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली. ३१मार्च ला कोळस्याने भरून निघालेले ट्रक कंपणीत न पाठविता पडोलीतील एका धर्मकाट्यावर लपवून ठेवण्यात आले. २ एप्रिल पासून अंधाराचा फायदा घेत रात्रीच्या वेळेस पडोली स्थित "आशिष" च्या टालावर ते कोळस्याने भरलेले ट्रक रिकामे करण्यात आले. कोळसा माफियांनी कोरोना प्रादुर्भावचा फायदा घेत प्रशासनाला करोडोंच्या चूना लावत आहेत. यात काही वरीष्ट वेकोली प्रशासन अधिका-याचें हात रंगले असल्याचे बोलल्या जात आहे. नुकताच वेकोली प्रशासनाने, कोळसा घोटाळ्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य खनिकर्माचे करार रद्द केले असताना सुध्दा कोळसा माफीयांनी नवनवीन शक्कल लढवून प्रशासनाच्या डोळ्यात धुळ झोकत आहेत. विशेष बाब देशातील कोरोनाच्या गंभीर स्थितीनंतर वाहतूक बंद करण्यात आली. अतिविशिष्ट सेवांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली. विज उद्योगाला अतिविशिष्ट वस्तूंमध्ये समावेश करण्यात आला व कोळशाला परवानगी देण्यात आली परंतु फक्त वीज उद्योगासाठी जाणारा कोळसा वेकोली मधून निघणार होता. कोळसा दळणवळणासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाची ची परवानगी घेणे आवश्यक होते, विना परवानगीने हे ट्रक काढण्यात आल्याचे समजते.

महत्वाचे म्हणजे वेकोली प्रशासनाने दिलेला डिओ फक्त चंद्रपूरात बंद आहे किंवा नागपूर मुख्यालयातर्गंत येणाऱ्या वेकोलीतून बंद करण्यात आले, हे मात्र न कळू शकणारे कोड आहे! नागपूर-उमरेडच्या खदानीतून सबसिडीचा कोळसा चालू असेल तर हा कोळसा गुजरातला पोहचत आहे किंवा नाही हे संशयास्पद असून ते तपासण्याचे काम वेकोली प्रशासनाचे आहे. कोळसा तस्करांनी कोळसा चोरी करण्यासाठी चंद्रपूर सोडून इतर कोळसा खदानीचे कागदपत्रे अदलाबदल करून आपल्या कर्तृत्वाचा अड्डा तर बनविला नाही ना? हे येणाऱ्या काळात कळणारच आहे. कोळसा तस्करीतून मिळणारा काळा पैसा, कोळसा तस्कर कोळसा हेराफेरी करण्यासाठी खर्च करीत आहेत. चंद्रपूरात फेब्रुवारी महिन्यात कोळसा माफियांचा भांडाफोड झाल्यानंतर कोळसा माफीयांनी कागदी घोडे नाचवत कागदपत्रांची अदलाबदली करीत तस्करी करण्याची जागा बदलीवण्यात आली आहे. त्यामुळे कोळस्यांचा काळाबाजार जैसे थे ची स्थिती सूरू असल्याची खात्रीलायक वृत्त आहे.चंद्रपूरातील पडोली येथे कैलास अग्रवाल यांच्या कोळसा टालवर पोलीसांनी धाड टाकून अनेक बेकायदेशीर ट्रक पकडून कारवाई करण्यात आली.त्यांनतर कोळसा माफिया कैलास अग्रवाल व इतर यांचे कोळसा तस्करी थांबविण्यासाठी प्रशासन खडबडून जागे झाले.मात्र प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी कोळसा माफीयांनी बनावट कागदपत्रे तयार करून स्वताचा बचाव सुरू केला.कोळसा चोरी करणारे कोळसा साठा करण्याची जागा बदलवू शकतात मात्र चोरीचा ठिकाण नाही हे सर्व वेकोली प्रशासनाच्या अधिका-यांना ठाऊक आहे.मात्र काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हात कोळस्याने काळे झाल्याने अधिकारी कोळसा माफियांवर कारवाई करू शकत नाही.
मागील काही महिन्यात कोळसा तस्करांचा मोठा रॅकेट पत्रकारांनी उघडकीस आणले आहे. प्रसारमाध्यमे आणि पोलीसांच्या डोळ्यात धुळ झोकण्यासाठी वेकोली प्रशासनाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हात असल्याने कोळसा माफियांनी नवी जागा नवा डाव फार्म्यूलाचा वापर करून मोठ्या प्रमाणात कोळसा तस्करी तर करीत नाही ना! याकडे वेकोली प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. देश सध्या कोरोना विषाणूंचा सामना करीत आहे.त्याचा सामना करण्यासाठी संपूर्ण प्रशासन एकवटला आहे.यात वेकोली प्रशासन सुध्द मागे नाही.मात्र काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हात कोळस्याने काळे झाल्याने वेकोली प्रशासन कोळसा माफियांवर कारवाईचा बडगा उगारणार का! हे सामान्य जनतेची मागणी आहे.

कोळसा तस्करी हा चंद्रपूर साठी नवीन विषय नाही. या धंद्यात अनेकांचे हात काळे झाले आहेत. या तस्करीतून मिळणारा मोठा पैश्याच्या लालसेने या धंद्यात अनेकांनी प्रवेश मिळविला आहे. काही स्वयंभू नेते, विविध पक्षाचे पदाधिकारी, अधिकारी यांना हाताची घेऊन चालणारा हा व्यवसाय चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. चंद्रपुरातील खाणींचा पसारा बघून या चंद्रपुरात अनेकांनी आपले पाय रोवले आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या यांना "धनरुपी" आशिष असतो. अंगलट येणारे प्रकरण पाहून या तस्करांनी आता नागपूर कडे आपली पाय वळवली असून "नागपूरच्या मस्तकावर चंद्रपूरची टोपी" घालण्याच्या प्रकार येत्या काळात उघडकीस येणार यात तिळमात्र शंका नाही.