14एफ्रीलपर्यंत घराबाहेर पडू नका..ना.विजय वडेट्टीवार

14 एप्रिल पर्यंत धीर धरा ! आपापल्या घरापर्यंत जाण्याची सर्वांची शासन व्यवस्था करेल : ना.वडेट्टीवार

Ø व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभाग

Ø धार्मिक सण व उत्सव घरी साजरे करण्याची विनंती

Ø जिल्हा सामान्य रुग्णालयात व्यवस्थेची पाहणी

Ø वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा घेतला आढावा

Ø 14 पर्यंत फक्त जीवनावश्यक वस्तू दुकाने सुरू राहतील

Ø  नागरिकांनी आतापर्यंत केलेले सहकार्य पुढेही कायम ठेवावे

 

चंद्रपूर, दि.7 एप्रिल : कोरोना विषाणू संसर्गात संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अनेक राज्यातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेकडो नागरिक चंद्रपूर जिल्ह्यात अडकून पडले आहेत. चंद्रपूरचे हजारो नागरिक आजूबाजूच्या जिल्ह्यात व राज्यात अडकून पडले आहेत. या सर्वांना घरी जायची घाई असली तरी 14 तारखेपर्यंत संयम बाळगावा. 14 एप्रिलनंतर आवश्यक व्यवस्था केली जाईल. शासन त्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे संकेत राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कामकाजाचा आढावा तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्यासाठी आज ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर जिल्हावासियांशी व्हिडिओ व ऑडिओ संदेशाद्वारे संवाद साधतानापरराज्यातील व परजिल्ह्यातील अडकून पडलेल्या नागरिकांनी 14 एप्रिल पर्यंत संयम पाळावा. त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोचविण्याची व्यवस्था करण्यात येईलअसे सूतोवाच केले. यासाठी केंद्र व राज्य सरकार रणनीती आखत आहे.आरोग्याच्या तपासणीसह अन्य नागरिकांना आरोग्यासाठी धोका होणार नाहीअशा पद्धतीची व्यवस्था तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यानंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत या नागरिकांची उत्तम काळजी घ्या. त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले .

       यासोबतच अन्य राज्यात अडकून पडलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जिल्हा प्रशासनपालकमंत्री यांच्यासोबत संपर्क साधलेला आहे. त्या सर्वांना देखील आहे त्याच ठिकाणी संयमाने राहण्याचे सुचविण्यात आले आहे.

       एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात सण आणि उत्सव एकत्र आले आहेत. सर्व धर्मीयांच्या सण-उत्सवाचा यामध्ये सहभाग आहे. मात्र ही वेळ प्रत्येकाच्या घरातल्या वयस्कछोटी मुले आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेण्याची आहे. त्यामुळे स्वतःच्या घरातील व समाजाच्या प्रत्येक  घरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही. यासाठी उद्याच्या हनुमान जयंती पासून शब-ए-बडीरातगुड फ्रायडेडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीरमजान ईदबुद्ध पौर्णिमा सर्व सणउत्सव व परंपरा श्रद्धा व आदराने आपापल्या घरीच साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये 7 एप्रिल पर्यंत एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही आहे. ही अतिशय चांगली बाब आहे. आगामी काळात देखील सामाजिक दुरीता पाळत परस्परांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. 204 विदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली असून ते सर्व निगेटिव आहे. काल 1 नागरिक नागपूर येथेच विदेशातून आला व त्या ठिकाणी त्याची तपासणी सुरू झाली. तसेच हजरत निजामुद्दीन येथून आलेले सर्व व नागरिक निगेटिव असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी लवकरच केसरी कार्डधारकांना देखील अन्नधान्याचे वाटप सरकारी स्वस्त धान्य दुकानातून सुरू होईलतशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे सांगितले. तसेच तपासणी कीट मागण्यात आली असून पुढील काळामध्ये जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यासाठी त्याचा उपयोग होईलअसे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या कोरोना रुग्णांच्या मदत कोषासाठीतसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मोठ्या प्रमाणात मदत करण्याचे आवाहन केले.चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर व अन्य सामाजिक संस्थांनी यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी या सर्वांचे आभार मानले.

      14 एप्रिल पर्यंत फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना उघडे ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. नागरिकांना त्रास होत असला तरी रस्त्यावर गर्दी होणार नाहीयासाठी फक्त जीवनावश्यक वस्तू दुकाने सुरू ठेवण्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी पुढील 14 तारखेपर्यंत असणाऱ्या या लॉकडाऊन कालावधीत पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. ते संचारबंदी साठी नाहीतर आपल्या घरातील नागरिकांच्या आयुष्य रक्षणासाठी रस्त्यावर आहेत. त्यामुळे पोलिस आणि प्रशासनाकडून देण्यात येणारे निर्देश अतिशय सन्मानाने पाळा. त्यांना सहकार्य कराअशी कळकळीची विनंती देखील त्यांनी आपल्या निवेदनात शेवटी केली.

या संबोधनाने नंतर त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन संभाव्य उद्योगाच्या परिस्थितीत तयार करण्यात आलेल्या यंत्रणेची पाहणी केली. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाला देखील भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह जिल्हा व आरोग्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.