आ.सुधिर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांना मास्क व डेटाॅल साबणाचे वाटप

वृत्तपत्र विक्रेत्याना मास्क व डेटॉल साबणाचे वितरण
आ. सुधीर मुनगंटीवार यांचा मदतीचा ओघ सुरूच
पेपर वाटपकर्त्या 300 युवकांना मिळाले सुरक्षा कवच


चंद्रपुर प्रतिनिधी:- चंद्रपुर महानगरात पेपर वाटप करणारे युवक कोरोना पासून मुक्त राहावे म्हणून पूर्व पालकमंत्री,आम सुधीर मुनगंटीवार यांनी वृत्तपत्र विक्रेत्याना मदतीचा हात दिला आहे.मदत कार्याचे विविध उपक्रम सर्वस्तरावर सुरू असताना आज गुरुवार (२२एप्रिल )ला सकाळी ६ च्या सुमारास किमान १०० पेपर विक्रेत्याना मास्क व डेटॉल साबण चे वितरण संजय गांधी मार्केट येथे करण्यात आले.
यावेळी वृत्तपत्र विक्रेता संघाचे जिल्हाअध्यक्ष विनोद पन्नासे,आय एम ए उपाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघ सचिव प्रशांत विघ्नेश्वर,विनोद चांदेकर,सुभाष मंदाडे,सचिन भदे, प्रमोद ढुमने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
चंद्रपुरवासी कोरोना महामारी पासून सुरक्षित रहावे म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.तसेच गरजू गरीब जनतेच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अनेक हात पुढे आले आहेत.आम मुनगंटीवार यांनी सुरवातीपासून या कार्यात स्वतःला झोकून दिले आहे.शक्य असेल ती मदत करण्याचे निष्पक्ष धोरण ठेवत त्यानी (१४ एप्रिल ,) विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभंपर्वावर मास्क व डेटॉल साबण वितरण उपक्रम हाती घेतला.१० हजार साबण व १० हजार मास्कचे वितरण या निमित्ताने करण्यात आले.या उपक्रमाचा एक भाग म्हणून घरोघरी पेपर वाटप करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्याना ही मदत देण्यात आली.१९ एप्रिल ला २०० विक्रेत्याना मास्क देण्यातआले .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घरोघरी वृत्तपत्र विक्रीवर बंदी आणली पण लगेच ग्रीन झोनसाठी ही बंदी उठविणात आली,त्याचा लाभ चंद्रपूरकराना झाला .त्यामुळे आज २२ एप्रिल ला उर्वरित१०० विक्रेत्याना आ. मुनगंटीवार यांचे तर्फे मास्क व डेटॉल साबण वितरित करण्यात आले विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने मास्कचा वापर करीत,स्वच्छ हाताने पेपर वितरण ची अट घालून पेपर विक्रेत्याना परवानगी दिली आहे.