आ.सुधिर मुनगंटीवारांच्या पुढाकारातून पुन्हा१०हजार जिवनाश्यक वस्तुच्या किट्सचे वितरण

आ.सुधिर मुनगंटीवारांच्या पुढाकारातून पुन्हा१०हजार जिवनाश्यक वस्तुच्या किट्सचे वितरण

चंद्रपूर प्रतिनिधी:-माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने गरीब व गरजू नागरिकांना 14 एप्रिल पासून पुन्‍हा 10 हजार जीवनावश्‍यक वस्‍तुंच्‍या किट्सचे वितरण करण्‍यात येत आहे. कोरोना विषाणुच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर जाहीर करण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊनमुळे गरीब व गरजू नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊन आता 3 मे पर्यंत वाढविण्‍यात आल्‍यामुळे 14 एप्रिल पासून पुन्‍हा 10 हजार जीवनावश्‍यक वस्‍तुंच्‍या किट्स गरीब व गरजू नागरिकांमध्‍ये वितरीत करण्‍यात येत आहे.
श्रीरामनवमीच्‍या शुभमूहूर्तावर प्रमुख धान्‍यासह जीवनावश्‍यक वस्‍तुंच्‍या किट्सचे वितरण करण्‍यात आले आहे. श्रीराम धान्‍य प्रसाद या नावाने ही कीट तयार करण्‍यात आली असून बल्‍लारपूर शहरात श्रीराम मंदीरात किटचे पूजन करून 10 हजार किटस चे वितरण करण्‍यात आले आहे. मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्‍यात आल्‍यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंती दिनाचे औचित्‍य साधुन पुन्‍हा 10 हजार किट्सचे वितरण करण्‍याचे काम सुरू आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने आतापर्यंत चंद्रपूर जिल्‍हयातील प्राथमिक आरोग्‍य केंद्र, चंद्रपूर व बल्‍लारपूर शहरातील किराणा दुकानदार व किरकोळ व्‍यावसायिक, फळ व भाजी विक्रेते, बल्‍लारपूर ग्रामीण रूग्‍णालय आदी ठिकाणी 500 ml च्‍या सुमारे 5000 सॅनिटायझरचे वितरण करण्‍यात आले आहे. रामनवमीच्‍या शुभमूहूर्तावर आयसोलेटेड रक्‍तदान या उपक्रमाचा शुभारंभ चंद्रपूर शहरात करण्‍यात आला आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत दररोज 5 रक्‍तदाते या उपक्रमांतर्गत रक्‍तदान करीत आहे. या उपक्रमाला 16 दिवस पूर्ण झाले असून 97 रक्‍तदात्‍यांनी रक्‍तदान केले आहे. संपूर्ण जिल्‍हयात रूग्‍णांसाठी रूग्‍णवा‍हीकेची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. तसेच रूग्‍णालयातून सुटी झालेल्‍या रूग्‍णांना घरी पोहचविण्‍यासाठी वाहनांची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. दररोज 10 ते 15 रूग्‍णांची घरी पोहचविण्‍याची व्‍यवस्‍था या उपक्रमांतर्गत करण्‍यात येत आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्‍यापासून अंदाजे 150 रूग्‍णांना या व्‍यवस्‍थेचा लाभ मिळालेला आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्‍यानंतर गुढी पाडव्‍यापासून दररोज सकाळ व संध्‍याकाळ चंद्रपूर व बल्‍लारपूर या शहरांमध्‍ये गरीब व गरजू नागरिकांना मोफत जेवण व्‍यवस्‍था नियमित उपलब्‍ध करून देण्‍यात आली होती. शासकीय रूग्‍णालयातील वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांना तसेच पोलिसांना भोजनाच्‍या डब्‍यांचे सकाळ, संध्‍याकाळ नियमित करण्‍यात आले आहे.