आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या आवाहनाला ५डाॅक्टरांनी केले रक्तदान

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या आवाहनानुसार जागतीक आरोग्‍यदिनी 5 डॉक्‍टर्सने केले रक्‍तदान


चंद्रपूर प्रतिनिधी: कोरोना विषाणुच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्‍या लॉकडाऊनमुळे रक्‍ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्‍या मित्र परिवाराला केलेल्‍या आवाहनानुसार श्रीराम नवमी पासून चंद्रपूर शहरात इंडियन मेडीकल असोसिएशनच्‍या सभागृहात दररोज 5 रक्‍तदाते रक्‍तदान करीत आहेत.

आज जागतीक आरोग्‍य दिनाचे औचित्‍य साधुन शहरातील डॉक्‍टर्सने या रक्‍तदान शिबीरात सहभाग घेत रक्‍तदान केले. प्रामुख्‍याने डॉ. पियुष मुत्‍यालवार, डॉ. अमित देवईकर, डॉ. अंबरीश बुक्‍कावार, डॉ. अभय राठोड, डॉ. अनुप पालीवाल यांनी रक्‍तदान केले. यावेळी आयएमए चे अध्‍यक्ष डॉ. किरण देशपांडे, डॉ. मंगेश गुलवाडे, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, प्रशांत विघ्‍नेश्‍वर, राम कुमार यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालयातर्फे डॉ. स्‍वप्‍नील चांदेकर, शुभांगी अगळे, अक्षय डहाळे, सुखदेव चांदेकर या रक्‍तदान प्रक्रियेमध्‍ये सहकार्य करीत आहेत.