वरोरा प्रतिनिधी- वरोरा तालुक्यातील कोसरसार ग्राम पंचायत आणि प्रहार जनशक्ती पक्षाने दिव्यागं बांधवास ग्राम पंचायत कडून पाच टक्के निधी चा वाटप करून किराणा आणि भाजीपाल्यांचे वाटप केले. देशात कोरोना या रोगाने थैमान घातले असुन संपूर्ण देशात लाॅकडाॅऊन केले गेले आहे. अशा परिस्थितीत कोणाच्याही हाताला काम नाही सर्व काम ठप्प असतांना दिव्यागं बांधवांच्या उदरनिर्वाहाचे साधन बंद आहे. घरचा कर्ता पुरूष जर दिव्यागं असेल तर त्या परिवारातील त्यांचे मुले बाहेर गावी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह सांभाळत आहे. पंरतु भारतामध्ये कोरोना या महामारीने थैमान घातले असल्याने दिव्यागं लोक कसे पोट भरतील. अशा परिस्थितीत कोण यांना मदत करेल हा प्रश्न गावातील प्रहार संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांना पडला असून एक छोटासा सामाजिक दायित्वाचा प्रयत्न ग्रामपंचायतीने केला असून सरपंच पुष्पा ताई कोसरकर, उपसरपंच पुरूषोत्तम कुडे, ग्रामसेवक राजकुमार दुर्गे, सुरज मेश्राम , बारकु मडावी, प्रहार संघटनेचे अमित बहादूरे, प्रितल दाते, गणेश उराडे, चाॅद शेख, बादल मुन, अनिकेत गोबे, तन्वीर सय्यद, इत्यादींनी अथक परिश्रम घेतले व दिव्यागांना आधार दिला.