ग्रिन झोन मधील जिल्हे लाॅकडाऊन मध्यून वगळण्याची शक्यता

आनंदाची बातमी :- चंद्रपूरचे लॉक डाऊन खुलणार ? जिल्ह्याअंतर्गत सर्व व्यवहार होणार सुरू ?

महाराष्ट्र कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत चंद्रपूर ग्रीन झोन मध्ये.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

देशात सद्ध्या लॉक डाऊनची तारीख ही ३० एप्रील पर्यंत वाढविली असली तरी महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, नांदेड, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यासह चंद्रपूर हा जिल्हा ग्रीन झोन मधे असून मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार जे ग्रीन झोन मधे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात संचारबंदी उठवून जिल्ह्यातील उद्दोग व इतर बाजार सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याने चंद्रपूर जिल्हा हा निश्चित आता सुरळीतपणे सर्व कामकाजासह सुरू होईल अशी अपेक्षा आहे.त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचा एक प्रकारे हा विजय झाला असून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार आणि जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्या उत्कृष्ट नियोजन आणि सक्त प्रशासन व्यवस्था यामुळे हे शक्य झाल्याने चंद्रपूरच्या जनतेने त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच असल्याची प्रतिक्रिया आता जनचर्चेतून उमटू लागली आहे.