तेलगंणा राज्यातून छत्तीगडला जाणारे६८मजुरासह तिन कंटेनर पकडले

चंद्रपूर तेलगंणा राज्यातून छत्तीगडला जाणारे६८मजुरासह तिन कंटेनर पकडले                                                                  चंद्रपूर : तेलंगाना राज्याला लागून असलेला यवतमाळ नागपूर आधी जिल्ह्याच्या जवळ असलेल्या चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोन मध्ये आहे परंतु तेलंगणा राज्यातून छुप्या मार्गाने चंद्रपुरात प्रवेश करणारे मजूर आता चंद्रपूर साठी डोकेदुखी ठरत आहे. आज मंगळवार दिनांक 28 रोजी सावली येथे प्रीतम ट्रान्सपोर्ट कंपनीच्या तीन कंटेनरमधून गडचिरोली जिल्हा कडे जाणारे 68 मजुरांना घेऊन तेलंगणाहून छुप्या पद्धतीने छत्तीसगडला जाणारे तीन कंटेनर सावली पोलिसांनी पकडले. ही कारवाई गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर आज पहाटे करण्यात आली. यात 68 मजूर आणि तीन चालक अशा 71 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक बाबासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक मस्के आणि सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप नितनवे यांनी केली.
तेलंगना राज्यामध्ये कामधंद्यासाठी गेलेले मधून लोक गाव नंतर त्याठिकाणी अडून बसले आहे आता या मजुरांनी आपल्या स्व गावी परतण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले करत असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याला धोका निर्माण झाला आहे. कालच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सीमा बंद करण्यात यावी असे प्रशासनाला निर्देश दिले आहे. परंतु जिल्ह्यात चोरट्या मार्गाने प्रवेश करणारे हे मजूर लोंढ्याने जिल्ह्यात प्रवेश करू लागले आहेत. यापूर्वीही गोंडपिपरी, मूल, चंद्रपुर या ठिकाणी या मजुरांना पकडून कोरोनटाईन करण्यात आले होते. आज सावलीमध्ये तिन कंटेनरमध्ये बसून हे मजदूर तेलंगाना इथून गडचिरोली मार्गे छत्तीसगडला जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांच्यावर सांगली पोलिसांनी कारवाई केली. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे जिल्हा सिमेवरील नाका तपासणीवर प्रश्न उभा राहिला आहे. तेलंगणातून चंद्रपूर मार्गे सावली पर्यंत जाणारे कंटेनर मध्ये बसून जाणाऱ्या या मजुरांना सीमांवर कां बरे थांबवण्यात आले नाही ? हाही तेवढाच गहन प्रश्न आहे आहे. यापूर्वीही 23 एप्रिल रोजी चंद्रपूर मुल मार्गावर तेलंगाना येथून सिमेंट भरून येणारे बाराच्या की वाहनांमध्ये तेलंगाना इथून छत्तीसगडला जाणाऱ्या 8 मजुरांच्या अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार mh-34 एबी 14 08 या सचिन जैन यांच्या चार चाकी वाहनाने हा अपघात झाला होता या वाहनाला सिमेंट वहनाची कोणतीच परवानगी नसल्याचे धक्कादायक वृत्त आहे. पोलीस स्टेशन येथे या प्रकरणाच्या गुन्हा तपास सूरू आहे. परजिल्ह्यातून मिळेल त्या वाहनाने, पायदळ चालत शेकडो किलोमीटरचा प्रवास करीत नियमांची पायमल्ली उडवत सुरु असलेली ही वाहतूक
सिमाबंदीच्या आदेशावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
सावली येथे आज करण्यात आलेल्या कारवाईमुळे सीमा बंदी, नाका बंदी यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या आदेशाचे कडक पालन होत नसल्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत, असे निदर्शनास येत आहे. नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मध्ये ग्रीन झोन असलेल्या जिल्ह्यांना शिथीलता देण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना दिले असल्याचे सांगितले आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यात यावर आत्ताची परिस्थिती बघता वेगळा विचार करावा लागेल. नुकतेच ग्रीन झोन असलेल्या भंडारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण आढळल्यामुळे खळबळ माजली होती, तसे चंद्रपुरात होऊ नये, यासाठी निर्देशांच्या कडक अंमलबजावणीचे धोरण अवलंबायला हवे तरच या जिल्ह्याला ठेवता येईल.