लाॅकडाऊन शिथिलता नाही ३मे पर्यत घराबाहेर पडू नये

लाॅकडाऊन शिथिलता नाही ३मे पर्यत घराबाहेर पडू नये जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार

Ø जिल्ह्यातील घर भाडे वसुली पुढील 3 महिने पुढे ढकलावे

Ø वृत्तपत्रांचे डोअर टू डोअर वाटप आजपासून बंद

Ø पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही शिथीलता नाही


चंद्रपूर, दि.19 एप्रिल : कोरोना विषाणू विरुद्ध सुरू असलेल्या लढा पुढील 3 मे पर्यंत कायम ठेवायचा असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लॉक डाऊन मध्ये कोणतीही शिथीलता नाही. 3 मे पर्यंत कोणीही घराबाहेर पडणार नाही.याची खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहे.

लॉकडाऊन संदर्भात कोणत्याही अफवांना बळी पडू नये. राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यांमध्ये कार्यवाही करण्यात येणार आहे. लॉकडाऊन शिथील करण्याबाबत व त्यामध्ये काही विशिष्ट सूट देण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच लॉकडाऊन कायम राहील. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र कोरोना विषाणूच्या उद्रेकाला वेळ लागत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून 3 मेपर्यंत काटेकोरपणे लॉकडाऊन पाळण्यात यावा,असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.

पोलीस प्रशासनाने उद्यापासून कारवाई कठोर करण्याचा निर्णय घेतला असून विनाकारण रस्त्यावर फिरणा-यांवर सक्त कारवाई करण्यात येईल. जीवनावश्यक वस्तूंची सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत ठेवलेली वेळ तशीच राहील. अन्य कोणताही बदल उद्यापासून होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी 3 मेपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या स्पष्ट निर्देशाची वाट बघावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

तीन महिने भाडे वसुली नाही

राज्यात भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून कोरोना विषाणू संघर्षाच्या काळामध्ये 3 महिन्यांचा किराया घेऊ नये, असे राज्याच्या गृहनिर्माण विभागाने स्पष्ट केले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील घरमालकांनी देखील किरायादारांकडून सक्तीने घरभाडे वसुली करू नये व त्यांना घरातून काढू नये असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाडेकरू आहेत. यापैकी अनेकांचे रोजगार सध्या सुरू नाहीत. त्यामुळे घर मालकांनी घर भाड्यासाठी आग्रही राहू नये. परिस्थिती नसेल तर पुढील 3 महिने घर भाडयाची मागणी करू नये. या काळात भाडे न दिल्यास किंवा भाडे थकल्यामुळे कोणतेही भाडेकरूंना भाड्याच्या घरातून निष्कासित करण्यात येऊ नये, अशा सूचना गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार यांनी दिले आहेत. या प्रमाणे जिल्ह्यामध्ये देखील सक्तीने भाडे वसुली करू नये असे त्यांनी स्पष्ट केले आहे

वृत्तपत्रांचे घरपोच वितरण बंद

वृत्तपत्राच्या छपाई संदर्भात शासनाने सूट दिली आहे .मात्र कोरोना आजाराला लक्षात घेता वृत्तपत्र व मासिकांच्या घरापर्यंत वितरणाला बंदी घालण्यात येत असल्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.मुख्य सचिवांनी यासंदर्भात स्पष्ट आदेश काढले असून यामध्ये वृत्तपत्रांचे डोअर टू डोअर अर्थात प्रत्येक घरी वितरण बंद करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश दिले आहे. या निर्देशाची जिल्ह्यात देखील पालन व्हावे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार 19 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 82 नागरिकांची नोंद करण्यात आली.  74 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सर्वच 74 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातूनराज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 29 हजार 224 आहे. यापैकी हजार 774 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 27 हजार 450 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 90 आहे.

            संचारबंदीच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न करणा-यांविरुध्द प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांकडून 11 लाखांवर दंड वसूल करण्यात आला असून एकूण 187 प्रकरणात ही कारवाई केली आहे. तर जिल्ह्यात 693 वाहने जप्त करण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, फौजदारी प्रक्रिया संहिता 1860, अन्वये विविध अधिसूचना व नियमावली निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.  तरीदेखील या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील 187 प्रकरणात एकूण 11 लाख 9 हजार 270 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या  53 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 693 वाहने जप्त केली आहेत. प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम व सुचनांचे उल्लंघन करणा-यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

            नागरिकांनी आपल्या अवतीभवती कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या  07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचारसमुपदेशनपाठपुरावाअॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669  या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्णप्रवाशांची चौकशीशहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी 07172-251597, टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर फोन करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा या टोल फ्री क्रमांक 155-398 वर दूरध्वनी करावा.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे