आज होणार गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षेचा निर्णय

ब्रेकिंग न्यूज :-आज होणार गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षांचा निर्णय जाहीर ?


गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन समितीची परीक्षांसदर्भात राज्यात पहिल्यांदाच ऑनलाईन सभा सम्पन्न !
राज्यपालांची सर्व विद्यापीठ कुलगुरू सोबत विडिओ कॉन्फरन्स द्वारे होणार आज पडचर्चा !

चंद्रपूर प्रतिनिधी :

गोंडवाना विद्यापीठाने राज्यात प्रथमच विडिओ कॉन्फरन्स द्वारे व्यवस्थापन समितीची ऑनलाईन सभा यशस्वीपणे घेतली असून टाळेबंदीत परीक्षा संदर्भात वाद झाल्यास प्रथम व द्वितीय वर्षाच्या लेखी व प्रात्याक्षिक परीक्षा महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर घेण्याबाबत तथा अंतिम वर्षाची परीक्षा (विद्यापीठाने घेण्याबाबतची सकारात्मक चर्चा या सभेत झाली.

गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न २१० महाविद्यालय बंद आहेत. या अंतर्गत सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर यांनी व्यवस्थापन समितीची अनिलाईन सभा शनिवारी दुपारी ३ वाजता घेणार असल्याची माहिती पत्राहारे समितीच्या सदस्यांना दिली होती. त्यानुसार शनिवारी दुपारी तीन वाजता कुलगुरू डॉ.कल्याणकर यांनी ही ऑनलाईन सभा घेतली. ऑनलाईन सभेत व्यवस्थापन समितीचे २२ पैकी १७ सदस्यांची उपस्थिती होती.
सदस्यांनी त्यांच्या लॅपटॉप मध्ये zoom miting app च्या माच्यभातून चर्चा केली. टाळेबंदी १ मेपर्यंत बाढल्यास महाविद्यालय स्तरावर प्रथम व द्वितीय वर्षाची लेखी तथा प्रात्याक्षिक परीक्षा घेण्यासंदर्भात चर्चा झाली व १५ मेपर्यंत आणि त्यानंतरही तो ३० मे पर्यंत लॉक डाऊन वाढल्यास परीक्षा अशाच महाविद्यालय स्तरावर घेण्याचा निर्णय होणार असल्याचे चर्चेतून समोर आले.

गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा सोबतच राज्यातील अनेक विद्यापीठाच्या परीक्षेचा प्रश्न सुद्धा असल्याने राज्यपाल ७ एप्रिल रोजी विडिओ कॉन्फरन्स द्वारे राज्यातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूशी ऑनलाईन संवाद साधून विद्यापीठाचे विविध विषयावर चर्चा करून विद्यापीठाच्या परीक्षेचा अंतीम निर्णय आज होणार आहे.