जिल्ह्यात नव्याने आलेले 123 नागरिक इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइनमध्ये, 24 एप्रिलपासून केशरी शिधापत्रिका धारकांनाही धान्य वाटप

जिल्ह्यात नव्याने आलेले 123 नागरिक इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइनमध्ये

24 एप्रिलपासून केशरी शिधापत्रिका धारकांनाही धान्य वाटप

Ø जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

Ø 78 पैकी 77 नमुने निगेटिव्ह ; 1 प्रलंबित

Ø भाजीपाला आवक सुरळीत व मुबलक

Ø  जिल्हाभरात मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई

Ø  जिल्ह्यातील सिमेंट उद्योगाला सुरुवात

Ø  अन्य 14 उद्योगांनी मागितली परवानगी

Ø  उद्योग समूहांसाठी ई- पासला सुरुवात

Ø  मोबाईल रिचार्जची दुकाने आजपासून सुरू

Ø  महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण साधेपणात

Ø  ग्रामीण भागात देखील साथरोगाचे मॉक ड्रिल

 

चंद्रपूर, दि.22 एप्रिल : चंद्रपूरला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला 14 दिवसांच्या संस्थात्मक कॉरेन्टाइनला (इन्स्टिट्यूशनल ) ठेवणे सुरू केले आहे. जिल्ह्यात आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. 78 पैकी 77 नमुने निगेटिव्ह आले आहे. 123 लोकांना सध्या इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात गरीब निराश्रित यांच्या अन्नधान्य पुरवठा सोबतच 24 तारखेपासून केशरी शिधापत्रिका असणाऱ्यांना देखील अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा प्रशासनाने केली आहे.

जिल्ह्यातील नागरिकांची व्हिडिओ संदेश द्वारा आज जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी संपर्क साधला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने आणू नका पुढील 3 मेपर्यंत लॉक डाऊन काटेकोरपणे पाळा आणि प्रशासनाचे कान डोळे होत बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची माहिती द्या, असे आवाहन त्यांनी आजच्या ताज्या व्हिडिओमध्ये केले आहे.

जिल्हा ग्रीन झोन मध्ये असला तरी एक रुग्ण जिल्ह्याला धोक्यात आणू शकतो. त्यामुळे कोणताही धोका पत्करू नका. घरातील एकाच सुदृढ नागरिकांनी बाहेर पडून जीवनावश्यक वस्तू घरी घेऊन जाव्यात. केशरी शिधापत्रिकाधारकांना 24 एप्रिल पासून मे महिन्याचे धान्य वाटप होत आहे. प्रतिव्यक्ती 8 रुपये दराने 3  किलो गहू व प्रतिव्यक्ती 12 रुपये दराने 2 किलो तांदूळ वितरित केल्या जाणार आहे.

पुढील एक-दोन दिवसात शहरांप्रमाणे गावात देखील एखादा रुग्ण आढळल्यास संपूर्ण गाव बंदी करण्याची रंगीत तालीम अर्थात मॉक ड्रिल केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक गावाच्या सरपंचांना सचिवांना गावातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. यासाठी आपल्या दारात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला सन्मानाची वागणूक व सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहनही त्यांनी आज केले आहे.

प्रीपेड मोबाईल धारकांना संपर्कामध्ये बाधा येऊ नये. यासाठी केंद्र सरकारच्या निर्णयानुसार मोबाईल रिचार्ज प्रतिष्ठाने सुरू करण्यात येत आहे. सोबतच हार्डवेअरची दुकाने सुद्धा उघडण्यात येत आहे. उदयापासून सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत दुकाने उघडी असतील.

मे रोजी येणाऱ्या महाराष्ट्र दिनाला यावर्षी अन्य सण-उत्सवाप्रमाणेच अत्यंत साध्या व मोजक्या उपस्थित फक्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झेंडावंदनाने साजरे केले जाणार आहे. अन्य ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नयेअसेही जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 90  टेम्पो मधून 1527  क्विंटल भाजीपाल्याची थेट आवक झाली आहे. तसेच 23 टेम्पो मधून 623 क्विंटल फळांची आवक झाली आहे.तसेच 3 ट्रक  मधून 803 क्विंटल कांदा बटाट्याची आवक झाली आहे. तर 623 टेम्पो व 13 ट्रक मधून 12016.51 क्विंटल अन्नधान्य इत्यादींची आवक झाली आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी दिली आहे.

नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील 207 प्रकरणात एकूण 12 लाख 14 हजार 970 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या  56 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 720 वाहने जप्त केली आहेत.प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम व सुचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

सिमेंट कारखाने सुरू:

चंद्रपूर जिल्ह्यातील अल्ट्राट्रेकएसीसी,माणिकगड,अंबुजाया  प्रसिद्ध सिमेंट कंपन्यांच्या 5 प्रकल्पांना सुरुवात झाली आहे. एक-दोन दिवसात या ठिकाणी पुन्हा सिमेंट उत्पादनाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. याशिवाय जिल्ह्यातील 14 उद्योजकांनी आपले उद्योग सुरू करण्याला परवानगी मागितली आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगी जिल्हा प्रशासनाकडून व राज्य शासनाकडून दिल्या जात आहे. आणखी काही उद्योग व्यवसायाला जिल्ह्यांमध्ये सुरुवात होईल अशी अपेक्षा जिल्हा उद्योग महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड यांनी व्यक्त केली आहे.

शहरात मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई :

सर्व सार्वजनिक ठिकाणी,कामाचे ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य राहील. सदर व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याचे आढळून आल्यास त्यास रु. 200 दंड आकारण्यात येईल आणि 3 मास्क देण्यात येणार आहे.असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी काढलेले आहेत. यासंदर्भात महानगरपालिका चंद्रपूरद्वारे मास्क न घातलेल्या सुमारे 25 व्यावसायिक,नागरिकांकडून प्रत्येकी रु.200 दंड वसूल करून त्यांना प्रत्येकी 3 मास्क देण्यात आले.

नागरिकांनी आपल्या अवतीभवती कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या  07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-25327507172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचारसमुपदेशनपाठपुरावाअॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669  या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्णप्रवाशांची चौकशी,शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी 07172-251597टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर फोन करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा या टोल फ्री क्रमांक 155-398 वर दूरध्वनी करावा.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.