चंद्रपूरकरांचा मुख्यमंत्री सहाय्यता व जिल्हा सहाय्यता निधीला
भरभरुन मदत
मदतीचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद मिळत असून, गेल्या 3 दिवसात 48 लक्ष 47 हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकारी सहाय्यता निधीसाठी उपलब्ध झाला आहे. जिल्हा सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी सामोरे येऊन योगदान दिले आहे.
आज प्रामुख्याने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन च्या वतीने रु.25 हजार, श्री.हनुमान मंदिर पंचकमिटी चंद्रपूर तर्फे रु. 21 हजार, श्री. सुधीर टेकाम चंद्रपूर यांचेकडून रु.11 हजार, बहुजन हिताय,सुखाय जि.प. मागा. कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने रु.20 हजार, जनता शासकीय-निमशासकीय सेवकांची सह.पतसंस्था चंद्रपूरच्या वतीने रु.50 हजार, श्री. कन्यका नागरी सहकारी बँक च्या वतीने रु.2 लक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. च्या वतीने रु.11 लक्ष,माध्यमिक शाळा कर्मचारी सह. पतसंस्था मर्या.चिमुर या संस्थेच्या वतीने रु. 11 हजार,जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक कर्म. सह. पतसंस्था मर्या.चिमुर च्या वतीने रु. 21 हजार,कृषी उत्पन्न बाजार समिती,चिमुर तर्फे रु. 51 हजार,चिमुर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कर्मचारी सह.पतसंस्थे तर्फे रु. 5हजार रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे.
चंद्रपूर तालुक्यातील येडली सेवा सह. संस्थेकडून रु.3 हजार, रयत नागरी पतसंस्था चंद्रपूर कडून रु.5 हजार,सेवा सहकारी संस्था मर्या. जांभुळविहीरा, महालगाव व जामगाव संस्थेतर्फे प्रत्येकी रु. 3 हजार,आ.वि.का. अडेगाव ता.चिमुर च्या वतीने रु. 5 हजार,नांदगाव ईन्कलाईन कामगार क्रेडीट को-आप सोसायटी लि. नांदगाव पोडे संस्थेतर्फे रु.21 हजार,बल्लारपुर नागरी म्युनिसिपल एम्प कोआप क्रेडीट संस्थेच्या वतीने रु. 3 हजार व मिरा नागरी सह. पतसंस्था, बल्लारपुर च्या वतीने रु. 3 हजार , ओपन कॉस्टमाईन कामगार सह. पतसंस्था बल्लारपुर च्या वतीने रु. 11 हजार,विविध कार्यकारी सह.संस्था भिसी कडुन रु. 11 हजार ,अल्ट्राटेक कर्मचारी सह. पतसंस्था, आवारपूर तर्फे रु.11 हजार, तंत्रशिक्षण राज्य कर्मचारी सह. पतसंस्था, चंद्रपूर च्या वतीने रु. 25 हजार, कृषी उत्पन्न बाजार समिती,चंद्रपूर तर्फे रु. 1लक्ष, सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सह. पतसंस्था, चंद्रपूर तर्फे रु. 1लक्ष रूपयाचा निधी उपलब्ध झाला आहे.
आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्था मर्या.टेकेपार( चिमूर) तर्फे रु.5 हजार, प्राथमिक सेवा सह. संस्था मर्या.नेरी तर्फे रु. 7 हजार, गुरुदेव ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था,नेरी तर्फे रु.10 हजार, आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्था खांबाडा रु.11 हजार, आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्था वाहाणगाव (चिमूर )तर्फे रु. 11 हजार,आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्था, खडसंगी तर्फे रु.5 हजार, महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ कर्म.सह.पतसंस्था,बल्लारपूर तर्फे रु. 5 हजार, महात्मा ज्योतिबा फुले नागरी सह. पतसंस्था,विसापूर तर्फे रु. 5 हजार, नगरपरिषद सफाई कामगार कर्म. सह. पतसंस्था,बल्लारपूर तर्फे रु. 3 हजार, श्री साई बिगरशेती ग्रामीण सह.पतसंस्था,बामणी तर्फे रु.10 हजार, भद्रावती तालुका नागरी सह. पतसंस्था, भद्रावती तर्फे रु.11 हजार, विविध कार्यकारी सह. संस्था, भद्रावती तर्फे रु.11 हजार, बोधिसत्व नागरी सह.पतसंस्था,भद्रावती तर्फे रु.5 हजार, छत्रपती शाहू महाराज नागरी सह. पतसंस्था,भद्रावती तर्फे रु. 5 हजार, चारगाव-तेलवासा ओपन कास्ट कर्मचारी सह.पतसंस्था,चारगाव तर्फे रु.11 हजार, नवभारत कर्मचारी सह.पतसंस्था,मुल तर्फे रु.5 हजार, भाग्यश्री महिला नागरी पतसंस्था,मुल तर्फे रु.11 हजार, धनश्री नागरी सह.पतसंस्था ,मुल तर्फे रु.21 हजार, सेवा सहकारी संस्था, एकार्जूना तर्फे रु.5 हजार, स्व. दादासाहेब देवतळे नागरी सह. पतसंस्था,वरोरा तर्फे रु.21 हजार, सेवा सह. संस्था महालगाव तर्फे रु.3 हजार, आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्था,सावरी त. वरोरा तर्फे रु.11 हजार, महाराष्ट्र राज्य वीज कामगार कर्मचारी सह. पतसंस्था,चंद्रपूर तर्फे रु.50 हजार, चंद्रपूर जिल्हा पाटबंधारे कर्म.सह.पतसंस्था,चंद्रपूर तर्फे रु.51 हजार तर आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्था, चारगाव तर्फे रु. 11 हजार चा धनादेश जिल्हाधिकारी सहायता निधीस जमा करण्यात आले.
त्यासोबतच मुख्यमंत्री सहायता निधी कोविंड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर तर्फे 1 लक्ष, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या वतीने रु.25 हजार, स्व. एम.डी.येरगुडे मेमोरियल एस.पी.एम चंद्रपूर तर्फे रु.51 हजार सहायता निधी देणगी स्वरुपात देण्यात आला.आजपर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 27 लक्ष 35 हजार 364 रुपयांचा निधी जमा झालेला आहे.
कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक 960310210000048 असून यासाठी आयएफएससी कोड BKIDOOO9603 असा आहे. जिल्ह्यातील उद्योजक,कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.