सोळा मजदुरांना चंद्रपूरात केले "क्वारनटाईन"तेलगणातून लपत छपत आले होते चंद्रपुरात !



 चंद्रपूर प्रतिनिधी:-आज रविवार दिनांक 26 रोजी तेलंगणा हैदराबाद येथून छत्तीसगड येथील बालाघाटी येथे जाणाऱ्या 16 ते 17 मजुरांना पठाणपुरा गेट जवळ पकडण्यात आले व त्यांना तपासणीनंतर क्वारनटाईन करण्यात आले. चंद्रपुरातील पठाणपुरा येथील मंदिराजवळ चोर मार्गाने येताना काही मजदुरांना सुज्ञ नागरिकांनी थांबविले. विचारपूस केली असता हे मजदूर तेलंगणातील हैदराबाद येथून पायदळ प्रवास करीत चंद्रपूरला धडकले होते. त्यांचे सोबत महिला व लहान मुले होती. त्यांना हीवरपुरी च्या हनुमान मंदिरापाशी थांबून आरोग्य तपासणी करून या 14 जणांना चंद्रपूरातील फुले प्राथमिक शाळेत क्वारनटाईन करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे तेलंगानातुन चंद्रपूर कडे येणार्या मजूरांचा लोंढा येणाऱ्या काळात चंद्रपूर साठी धोक्याचे ठरू शकते. महामार्गावर होणारी कडक तपासणीतून मार्ग काढीत या मजुरांना चोर मार्गाचा अवलंब करावा लागत आहे, ही चंद्रपूर साठी धोक्याची घंटा आहे. नुकतेच चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार यांनी जिल्ह्यामध्ये परराज्यातून येणाऱ्या तसेच जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची माहिती प्रशासनाला द्यावी असे नागरिकांना आवाहन केले आहे. चंद्रपुरात मुख्य मार्गावर असलेली लागलेले बॅरिकेट्स, कठडे हे सगळेच चंद्रपूरच्या सुरक्षेसाठी आहेत. चंद्रपूर करांनी घरातच लावून लाॅकडाऊन च्या आदेशाचे पूर्ण पालन केले आहे व करीत आहे परंतु बाहेरून येणारा मजुरांचा लोंढा आता थांबून ही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यासाठी कडक उपाय योजना करणे गरजेचे आहे.