मिरची तोडण्यासाठी गेलेले कामगार घराच्या ओढीने झाले बेजार.

मिरची तोडण्यासाठी गेलेले कामगार घराच्या ओढीने झाले बेजार.                                  
चंद्रपूर प्रतिनिधी:- कोरोनाच्या विषाणूणे जगभरात कहर माजविला आहे.भारतातही अनेक राज्यांत कोरोनामुळे मृत्यु पावले आहेत.त्यामुळे केद्र सरकारने संचारबंदी गेल्या महिनाभरापासून लावण्यात आली आहे.त्यामुळे जे आहेत ते तिथेच अडकलेले आहेत. जिल्हयातील अनेक जण मजूरीच्या शोधात तेलगंणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेलेले असून लाॅकडाऊन मुळे अडकलेले आहेत.नुकताच तेलंगणा राज्यात एका महीलेचा पती मृत्यु पावल्यानंतरही त्या महीलेला पतीचे अंतीम दर्शनही घेता आले नाही.इतकेच नव्हे तर एका मुलाला पित्याचे छत्र हरविल्यानंतरही काही लोकप्रतीनिधी व प्रशासनाच्या मदतीने त्या मुलाला महीणाभरानंतर मातृछत्र मिळाले.इतक्या भयावह परीस्थिती सामोरे जात असतांना अनेक ह्रदय पिटाळून लावणारे घटना घडत आहेत.तेलगंणात गेलेल्या काही लोकांची प्रकृती बिघडली आहे.जुनासुर्ला ता.मुल येथील सोमबाई बिराजी पाटेवार,बेबीबाई बुधाजी कंचावार व ईतर महीलांना रक्त कमी असल्यामुळे किडणीवर सुजण व असे अनेक आजार झालेे आहते.तेथील डाॅक्टरांना भाषेच्या अभावामुळे रोगाचे निदान कळत नसल्याने योग्य उपचार होत नसल्याचे त्यांनी आपल्या नातेवाईकांना कळविले आहे.अनेकांना घराच्या ओढीने मजूरांना वेड लावले आहे.जिल्हा स्तरावर परराज्यात अडकून पडलेल्या मजूरांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.मात्र अजूनही प्रशासनाला तोडगा मिळाला नाही.त्यामुळे मजूर आहे तिथे लाॅकडाऊन झाले आहेत.त्यामुळे मजूरांना आता घराच्या ओढीने बेजार करून सोडले.