▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

चंद्रपुरकरांना धडकी भरविणार्या "त्या" वृत्ताला अखेर पूर्णविराम! चंद्रपूर चे "ते" रुग्ण कोरोनामुक्त! दांपत्यांना रुग्णालयातून सुट्टी

 
चंद्रपूर विशेष): चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोन मध्ये आहे, अद्यापपावेतो कोणताही रुग्ण याठिकाणी आढळला नाही. परंतु मागील काही दिवसापासून चंद्रपुरात कोरोना रुग्ण आढळले, या वृत्ताने चंद्रपूरकरांमध्ये धडकी भरली होती, आज त्यातून ही चंद्रपूरकर मुक्त झाले आहेत. मूळचे चंद्रपूर येथील असलेले दाम्पत्य इंडोनेशिया वरून आले होते व त्यांना नागपूर येथील विमानतळावरूनचं कोरोनटाईन (विलिनीकरण) करण्यात आले. विलगीकरणानंतर काही दिवसातच यातील एक रुग्ण हा कोरोनाबाधित असल्याचे तपासणीत आढळले. त्यानंतर विविध माध्यमातून, शासकीय यंत्रणातून जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्याचे वृत्त पसरायचे, राज्याच्या-देशाच्या यादीमध्ये जिल्ह्यात कोरोना रूग्ण अशी शासकीय अधिकृत माहिती समोर येऊ लागली. अधिकृत साईडवर सूद्धा अशा पद्धतीची माहिती दिसू लागली. आपसुकच चंद्रपूरकरांना हा प्रसंग धडकी भरवणारा होता आणि त्यात सत्य ही होते, परंतु जिल्ह्यातील अधिकृत शासकीय माहितीनुसार विश्वसनीयरित्या जिल्ह्यात रुग्णच नाही, असे सांगितले जात होते. दृकश्राव्य माध्यमे, सोशल माध्यमे आणि विविध अधिकृत साइटवर मात्र जिल्ह्यात रुग्ण असल्याची ही धडकी भरवणारी माहिती यामध्ये सगळ्यात जास्त दडपण यायचे ते संबंधित जबाबदार वरिष्ठ शासकीय अधिकारी, लोकप्रतिनीधी, छापील व दृकश्राव्य माध्यमांचे स्थानिक संपादक-पत्रकार यांचेवर! एखाद्या ठिकाणी फक्त दाखविले की चंद्रपुरात रुग्ण आहे तरी उपरोल्लेखितांना फोन करून सत्य-वास्तव काय आहे, हे विचारणार्यांच्या संख्येचे प्रमाण फार होते. मागील काही आठवड्यापासून हा नित्यनेमाचा प्रकार होता. वरीलपैकी अपवाद वगळता सार्यांनाच याचा अनुभव आला आहे. वृत्तसंस्थांना जिल्ह्यातील अधिकार्‍यांवर पूर्ण विश्वास, त्यामुळेच वृत्त जेवढ्या लवकर पसरायचे, तेवढ्याच लवकर ते थंड ही व्हायचे, परंतु या दोन आठवड्यात कोरोनाची भिती काय?, याचा अकल्पनिय अनूभव चंद्रपुरकरांना आला आहे. नुकतेच दोन दिवसांपूर्वी या चर्चेने मोठी अफवा पसरली होती. त्याचे कारण भारत सरकारच्या covid-19 या शासकीय साइटवर चंद्रपुरात दोन पाझेटिव्ह दाखविण्यात आले. ही माहिती खोटी नाही याच्या पूर्ण विश्वास असलेल्यांनी द्रुतगतीने प्रत्येक परिचितांना जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती दिली. परिचित अधिकाऱ्यांचे, पत्रकारांचे फोन खणखणा वाजू लागले, शासकीय साईडवर असलेले स्क्रींनशाॅट ज्याच्या-त्याच्या मोबाईल वर फिरू लागले, चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी त्वरित आपल्या मोबाईलवरून no positive, report yet असा मेसेज पत्रकारांना दिला, तरीसुद्धा धडकी भरलेल्या चंद्रपूरकरांना काहीतरी "गोलमाल" आहे या शंकेने पिसाळून टाकले होते, प्रसंगाचे गांभिर्य लक्षात घेवून चंद्रपूरचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी त्वरित व्हिडिओद्वारे चंद्रपुरात कोरोना रुग्ण नसून इंडोनेशिया येथून आलेला रुग्ण हा मूळचा चंद्रपूरचा आहे व त्याला नागपूर येथे कोरोनटाइन करण्यात आले आहे, याबद्दलची वास्तव परिस्थिती कथन केल्यानंतर चंद्रपूरकरांचा जीव भांड्यात आला. महत्त्वाचे म्हणजे चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोन मधून येललो झोन मध्ये टाकण्यात आला होता. ज्या दोन रुग्णामुळे ही परिस्थिती चंद्रपूरकरांना बघायला मिळाली, मूळचे चंद्रपूरचे असलेले तेच रुग्ण दाम्पत्य या आजारापासून बरे झाले असून नागपूर येथील मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे हे शक्य झाल्याचे वृत्त झळकले व चंद्रपूरकरांच्या मनामध्ये असलेल्या धडकेला आज पूर्णविराम मिळाला आहे. या रोगांतून बर्या झालेल्या या रुग्ण दाम्पत्यांनी त्यांना मिळालेल्या सेवेबद्दल मेडिकल कॉलेजच्या आरोग्यसेवेबद्दल आभार मानले. तर मेडिकलच्या डॉक्टर,आरोग्यसेविकाणी टाळ्या वाजवून या रुग्ण दाम्पत्याचे अभिनंदन केले व सर्वांनी आरोग्य क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना या बिकट समयी मदत करण्याचे आव्हान केले आहे. या दाम्पत्यांना येणाऱ्या १४ दिवस पुन्हा नागपुरमध्येच विलगीकरण कक्षात ठेवणार असल्याची माहिती मिळाली आहे.

फक्त चंद्रपुरात रुग्ण मिळाला आहे, या वृत्ताने जर धडकी भरत असेल, काळीज हेलावत असेल तर चंद्रपूरकरांनी आतातरी शासकीय निर्देशांचे पालन करायला हवे असे सांगावेसे वाटते. वेळ नियंत्रणात आहे, परंतु धोका टळलेला नाही हे मात्र लक्षात ठेवले तरी आपण "गड जिंकला" असे म्हणू शकतो. "सिंह गेला" अशी म्हणण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.

सविस्तर वृत्त असे की, मुळ चंद्रपूरच्या व विदेशातून नागपुरात परतलेल्या दांपत्याला कोरोना झाल्यावर दोघांवर शासकीय वैद्यकीय महाविधालय व रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले. दोघेही कोरोनामुक्त झाल्याचा अहवाल येताच आज त्यांना सुट्टी देण्यात आली. परंतु दोघांनाही खबरदारी म्हणून पुढचे १४ दिवस येथे विलगीकरणात ठेवले जाणार आहे.
कोरोना मुक्त झाल्यामुळे आज दोघांना मेडिकल मधून सुटी झाल्यानंतर डॉक्टरांनी तसेच परिचारिका, वैधकीय कर्मचारी यांनी टाळ्या वाजवून निरोप दिला, कोरोना मुक्तीसाठी केलेल्या उपचाराबद्दल त्यांनी डॉक्टर व कर्मचारी यांच्या बद्दल कृतद्नंत व्यक्त केली व आभार मानले.

चंद्रपूर येथील ३९ वर्षीय पती आणि ३२ वर्षीय पत्नी असे दोघेही इंडोनेशीयाहून दिल्ली मार्गे नागपुरात आले होते. दोघांनाही प्रशासनाने खबरदारी म्हणून विलगीकरणात ठेवले. ६ एप्रिलला पतीला कोरनाची लागन झाल्याचे पुढे आले. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करून त्यांच्या पत्नीचीही तपासणी करण्यात आली. तिलाही करोना असल्याचे स्पष्ट झाले. मेडिकलमध्ये यशस्वी उपचारानंतर त्यांचे नमुने सलग दोन दिवस तपासण्यात आले. दोन्ही वेळा ते नकारात्मक आल्याने बुधवारी त्यांना सुट्टी दिली गेली. याप्रसंगी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ साजल मिश्रा,डॉ. राजेश गोसावी, वैद्याकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी, करोनाबाबतचे नोडल अधिकारी डॉ. मोहम्मद फैजल, डॉ. कंचन वानखेडे, डॉ. मुखी, मेट्रन मालती डोंगरेसह येथील कर्मचाºयांनी टाळ्या वाजवून त्यांना निरोप दिला. त्यांनीही डॉक्टरांचे आभार मानले. जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या रहाण्यासह उपचाराच्या सुविधेवरही त्यांनी समाधान व्यक्त केले.