मटन सातशे रूपये तर चिकन चारशे रुपये नियमांना बसविले धाब्यावर

कोरोनाच्या धर्तीवर मांसाचे दर कडाडले
चंद्रपूर : शुक्रवार दिनांक 27 रोजी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी मास विक्री करण्यास बंधन नसल्याचे जाहीर केले. सोशल डिस्टन्स या नियमाचे बंधन पाळण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले परंतु आज अनेक ठिकाणी मास विक्री करताना ती अव्वाच्या सव्वा दराने करण्यात आली. आठशे रुपये बकऱ्याचे मटण तर चारशे रुपये कोंबडीचे मटण या या दराने मास विक्री करून ग्राहकांची अक्षरशः लूट करण्यात यात आली. मास विक्रीच्या दुकानात ग्राहकांनी तुंबळ गर्दी केली. मास विक्री करणाऱ्यांनी मात्र यावर बंधन आणण्याचे टाळले व नियमाला हरताळ फासले.
कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत, त्यातही जिल्हास्तरावर विविध उपाययोजना राबवून जनजागृती केली जात आहे. मात्र काहीजन नियम धाब्यावर बसवून काम करीत आहेत.नुकतेच जिल्हाधिकारी महोदयांनी मांस विक्रीची परवानगी दिली. पण त्यातही काही नियम विक्री करणाऱ्यांना देण्यात आले होते. मास घेतांना काही अंतरावर उभे राहणे, तोंडाला माॅस्क लावून जाणे अत्याव्यशक्य होते. मात्र ग्राहकांना व मांस विक्री करणार्यांना कोरोना विषाणुच्या दुष्परिणामांचे महत्त्व अजुनही कळले नसल्याचे यावरुन दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर मास विक्री करणाऱ्यांनी चक्क चारशे ते पाचशे रुपयांनी विकणारी बकऱ्यांची मटन तब्बल आठशे रुपये किंमतीने तर कोबंडीचे मास चारशे रुपये किलोप्रमाणे विक्री करण्यात येत होती. दामदुप्पट करून ग्राहकांची जणु लुट केली जात आहे. एकीकडे कोरोनामुळे देशातील सामान्य नागरिक होरपळले जात असताना देशभरात लाॅकडाॅऊन असल्याने नागरिकांना वेळोवळी घराच्या बाहेर पडण्यास सक्त ताकीद दिली जात आहे.मात्र नागरिकांकडून प्रतीसाद मिळत नाही.