राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अर्थसंकल्पात यश!




धनगर समाजासाठी महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना केली जाणार असून त्यामधून धनगर समाजाला दहा हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी माहिती अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना हि माहिती दिली.

या महामंडळाचे मुख्यालय अहमदनगर येथे असणार आहे. तसेच राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेंतर्गत मेंढीपालनासाठी देखील भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा व धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीप्रमाणे शैक्षणिक सुविधा लागू करण्यात याव्या अश्या इतर मागण्यासह राष्ट्रीय समाज पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदने दिली होती.त्याचीच दखल घेत राज्याचे वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पात घोषणा केली.

आज विधानसभेमध्ये महाराष्ट्राचा अर्धसंकल्प सादर होत आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुका पहाता सरकारकडून या अर्थसंकल्पीय अधिवेशात काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात येतील अशी अपेक्षा होती. त्या अपेक्षेप्रमाणे अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात येत आले. या अर्थसंकल्पातून धनगर समाजाला मोठा दिलासा देण्यात आला आहे. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून धनगर समाजासाठी महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना केली जाणार असून, समाजासाठी 10 हजार कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाची तरतुद करण्यात आली आहे. अशीही माहिती वित्त मंत्री देवेद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात दिली.