▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

एनडीएचे सरकार रापसशिवाय बनणार नाही....आ.जानकर



पंढरपूर:- रासप सध्या सर्वत्र पक्ष वाढीसाठी काम करत आहे. आम्ही डिमांड करणारे नव्हे तर कमांड मिळवणारे होत आहोत. त्यामुळे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रासप स्वबळावरून लढून सर्वांना आपली ताकद दाखवून देईल, असे प्रतिपादन माजी मंत्री , राष्ट्रीय अध्यक्ष तथा आ. महादेव जानकर यांनी केले.

रासपच्या पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्यासाठी आ. महादेव जानकर पंढरपुरात आले होते, त्या मेळाव्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.जानकर म्हणाले, २०२४ साली आम्हाला विचारात घेतल्याशिवाय एनडीए चे सरकार बनणार नाही. यांची आम्ही काळजी घेऊ. त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आता आपली ताकद दाखवली पाहिजे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहे. त्यात स्वबळावर लढण्यासाठी पदाधिकाऱ्यांनील आतापासून तयारी करावी. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय माने, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख श्रीमंत छे, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत सोडगे,शहराध्यक्ष सतीश बुजुर्गे, अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर, ज्ञानेश्वर शिरसागर, भीमा मोठे, किशोर चौधरी, आप्पा भगत, अमोल नवले, अनिकेत सोलंकर, लक्ष्मण के वांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


एनडीएने लोकसभेला उमेदवारी नाकारली
तरी लढणार आगामी लोकसभा
निवडणुकीसाठी बारामती, परभणी आणि माढा या तीन मतदारसंघावर आपले लक्ष आहे. एनडीएने आपली उमेदवारी नाकारली तर आपण निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय समाज पक्षाला सोबत घेतल्या शिवाय राज्यातील व केंद्रातील एनडीएचे सरकार बनणार नाही. आगामी २०२४ च्या आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रासपने तसा बंदोबस्त केला आहे, असा सूचक इशारा आ. जानकर यांनी भाजपला यावेळी दिला.