उद्या मेंढपाळ धडकणार गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर



गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयात झाडे, झाडया या जातीने बोगस जातीचे दाखले घेऊन धनगर समाजाचे सवलती लाटत असल्याने जातीचे दाखले रद्द करावे, या आधारे नोकरी बळकाविणाऱ्यांना बडतर्फ करावे, वनक्षेत्रात शेळया मेंढया चराईस परवानगी द्यावी या मागण्या घेऊन धनगर समाज संघटनांच्या वतीने मेंढयांसह मेंढपाळ आक्रोश मोर्चा 26 डिसेंबरला गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे.

गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयातील झाडे कुणबी हे शासनाची दिशाभुल करीत खोटया कागदपत्राचे आधारे धनगर भटक्या जमाती के चे जातीचे दाखले काढून नोकरी व इतर सवलती लाटत असल्याने ती जातीची दाखले, जातवैधता प्रमाणपत्र रद्द करावे व त्याआधारे नौकरी बळकविणान्यांना नोकरीवरून बडतर्फ करावे. धनगर समाजाचा मुळ व्यवसाय शेळया-मेंढया पाळणे आहे आहे परंतू चराईसाठी क्षेत्र नसल्याने व्यवसाय बंद होण्याचे मार्गावर आहे. त्यामुळे वनक्षेत्रात शेळ्या-मेंढया चराईस परवानगी द्यावी या मागण्या घेऊन मेंढपाळ आकोश मोर्चा दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे काढण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन धनगर समाज संघर्ष समिती नागपूर विभाग अध्यक्ष डॉ. तुषार मर्लावार व धनगर समाज महासंघ, जय मल्हार सेना, अहिल्यावाहीनी धनगर समाज, धनगर जमात संघटना चंद्रपूर, अखिल भारतीय मौर्य काती सेना, महाराणी अहील्यादेवी प्रबोधन मंच, वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशनचे वतीने करण्यात येत आहे.