राज्यात घडत असलेल्या घटनेला मुख्यमंत्री जबाबदार



महाराष्ट्रातील नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोग्यांच्या केलेले विधानावरुन वादंग निर्माण झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भोंग्यांच्या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयानं जे निर्णय दिलेले आहेत त्याच कायदेशीर पालन व्हाव असे त्यांनी म्हटले आहे.
नुकताच हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आलेल्या,व चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी राणा दाम्पत्यांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहे.न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर नवनीत राणा यांना कस्टडीमध्ये अतिशय हिन दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.या सर्व प्रकरणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भुमिका घेत हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही तर काय पाकीस्तानात जाऊन म्हणायची का ? हनुमान चालिसा म्हटले म्हणून देशद्रोहाचा गुन्हा लावणार का? मी म्हणतो हनुमान चालीसा, लावा माझ्यावर देशद्रोह! असा आक्रमक इशारा करत ठाकरे सरकारवर फडणवीसांनी हल्लाबोल केला!