वन्यप्राण्यांचा हल्ल्यामुळे सिटीपीएस कामगारांचा कामबंद आंदोलनाचा पवित्रा



वन्यप्राण्यांचा हल्ला वाढत चाललेला असल्याने कामगारांनी कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.लगातार दोन दिवस वन्यप्राण्यांचा हल्ला वाढलेला असून सिटीपीएसमध्ये दि१६ फेब्रुवारी २०२२रोजी कंत्राटी कामगार भोजराज मेश्राम या इसमाचा वाघाने हल्ला करून ठार केले होते.
तर दि.१७ फेब्रुवारी २०२२ रोजी बिबट्याच्या हल्ल्यात राज भडके रा. दुर्गापूर नेरी, वय १६ वर्षे याला ठार केल्याने परीसरात दहशत निर्माण झाली आहे.वनविभाग मात्र कुंभकर्णाची झोप घेत आहे.वनविभागाकडे प्रशिक्षीत शार्प श्युटरच नसल्याने वनविभाग मुग गिळून बसले आहे.
वनविभागाकडे प्रशिक्षीत श्युटर असते तर कदाचित वाघाला जेरबंद करता आला असता.व अनेक निष्पापाचे जिव वाचले असते.


सिटीपीएसच्या अवती भवती चार ते पाच वाघाचे अस्तित्व असल्याचे बोलले जात आहे.त्या वाघांना पकडण्याच्या परवानगी साठी मुख्य सचिव वनविभाग यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याचे कळते.वाघाना जेरबंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन भटारकर यांचे अन्यत्याग आंदोलन सुरूच असून जोपर्यंत वाघांचा बंदोबस्त करणार नाही तोपर्यंत अन्यत्याग आंदोलन सुरूच राहणार असल्याचे भटारकर यांनी सांगितले आहे.तर त्यांच्या आंदोलनाला आज सर्व कामगारांसह सर्वसामान्य नागरिकांनी जाहीर पाठिंबा व समर्थन दिले.
कामगारांनी ही जोपर्यंत वाघांचा बंदोबस्त करणार नाही तोपर्यंत कामावर न जाण्याचा पवित्रा घेतला आहे.