▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455 ▪️ RNI No. MAHMAR/2011/37424/

वरोऱ्यात भीषण अपघात २ मृत्यू तर अनेक गंभीरवरोरा शहराच्या रत्नमाला चौकातिल लगान बार जवळ अचानक एका ट्रव्हल्स च्या ड्रायव्हर चे गाडीवर चे नियंत्रण सुटल्याने मुख्य रस्त्यावरील डिवायडर च्या लोखंडी पोल तोडून दुसऱ्या बाजूच्या रोडने जात असलेल्या एका ट्रक ला जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रव्हल्स मधील दोन ते तीन प्रवाशी मृत पावल्याची बातमी असून अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. गंभीर जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थानांतरण होण्याची शक्यता आहे.

स्थानिक रत्नमाला चौकात झालेल्या अपघातात ट्रव्हल्स चा ड्रायव्हर मोबाईल फोन वर बोलत असल्याची चर्चा असून त्यातूनच गाडीच्या स्टेरिन्ग वरचे नियंत्रण सुटले व अपघात घडला असावा अशी माहिती आहे.आता या ट्रैव्हल्स मालक चालकावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे