माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांना कोरोनाची लागण



मुंबई : सध्या राज्यासह देशातील राजकीय मंडळी कोरोना पाॅझिटिव्ह होत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी आज सोमवारी (ता.दहा) सोशल मीडियावर माहिती दिली आहे. जानकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने कोरोना टेस्ट (Corona) करुन घेतली. माझी कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे. मी डाॅक्टरांच्या सल्ल्याने आयसोलेशनमध्ये आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी, अशी विनंती त्यांनी इतरांना केली आहे.


राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे रात्री ११ ते सकाळी पाचपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (Mahadev Jankar Tested Corona Positive)मंत्रीही जनतेला कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करित आहेत. कोरोनाचा व्हेरिएंट ओमिक्राॅनचे रुग्णसंख्या वाढत चालली आहे. या व्हेरिएंटला कमी समजू नका. असा इशारा संशोधक देत आहेत. राज्यात आतापर्यंत 

कोरोनाची लागण झालेले राजकीय नेते

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे
माजी मंत्री पंकजा मुंडे
मंत्री एकनाथ शिंदे
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
आदिवासी मंत्री के. सी. पाडवी 
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
खासदार सुप्रिया सुळे
आमदार सागर मेघे
आमदार राधाकृष्ण विखे पाटील
आमदार शेखर निकम
आमदार गिरीश महाजन
आमदार इंद्रनील नाईक
आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)
आमदार माधुरी मिसाळ
माजी मंत्री दिपक सावंत
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
आमदार रोहित पवार

आमदार धीरज देशमुख यासह इतर राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.