सिटीपीएसच्या कुणाल इंटरप्राईसेस विरुद्ध कामगार सेनेचा एल्गार



चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमध्ये कुणाल इंटरप्राईसेस मध्ये अनेक वर्षांपासून काम करीत असलेल्या कामगारांचे मासिक वेतन गेल्या अनेक महीण्यापासून देण्यात आले नसल्यांनी कामगारांनी काम आंदोलन सुरू केले आहे.
शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेना सलग्न महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेनेनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
युनिट क्र.८ व ९ मध्ये सिएचपी डी व वॅगनर टिपलर मधील कामगार मागील अनेक वर्षांपासून मे.कुणाल इंटरप्राईसेस कंपनीमध्ये काम करीत आहेत.मात्र मे. कुणाल इंटरप्राईसेस च्या व्यवस्थापनेनी कामगारांचे वेतन प्रशासकिय नियमानुसार न देता नियमांचे उल्लंघन करीत आहे.याबाबत प्रशासनाला अनेक निवेदने देण्यात आली मात्र कंपनीने याकडे दुर्लक्ष केले असल्याने दोन्ही साईड वरील कामगारांनी १९/१/२०२२ पासून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. प्रशासनाला देण्यात आलेल्या पत्राच्या संदर्भानुसार कामगारांचे मासीक वेतन नियमित तारखेच्या आत मिळेपर्यंत कामबंद सुरु राहील असे शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेना सलग्न महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेनेचे जिल्हा अध्यक्ष मां. बंडुभाऊ हजारे, अध्यक्ष प्रफुल सागोरे,सचिव प्रमोद कोलारकर, उपाध्यक्ष संतोष ढोक,संघटक अमोल भट , सहसचिव राजकुमार हजारे, पंकज इंगोले, यांनी केली आहे.