कू ॲप च्या माध्यमातून मतदारांना सशक्त बनविण्यासाठी जागृती अभियान!




मुंबई : येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसंदर्भाने मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कूने खास घोषणा केली आहे. आता कूचा मंच आता विविध भाषांमध्ये अनेक हायपरलोकल स्वरूपाचे प्रयोग करणार आहे.

या पुढाकार घेऊन केलेल्या प्रयोगांचा उद्देश असेल, मतदारांना मतदानाआधी सशक्त बनवणे, संघटीत ठेवणे आणि त्यांना गरजेची माहिती पुरवत राहणे.
भारतीय भाषांमध्ये ऑनलाइन अभिव्यक्तीला सक्षम करणारा सर्वात मोठा मंच म्हणून कू अँपकाही आगळे उपक्रम राबवणार आहे. निवडणुक प्रक्रियेवरचा मतदारांचा विश्वास वाढवण्यासाठी विशेष फीचर्स सादर करण्यासह कूजागृती अभियानही चालवणार आहे. हा मंच मतदारांना आपला मताधिकार वापरण्यासाठी सजग निर्णय घेण्याबाबत मार्गदर्शन करेल.


निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या राज्यांच्या मतदारांसाठी कू अँपएक डेडिकेटेड सेक्शन उभारणार आहे. यात हिंदी, पंजाबी, मराठी इ. भाषामध्ये लाइव्ह अपडेट्स, उमेदवार आणि पक्षांबाबतच्या बातम्या आणि मतदारसंघासंबंधीच्या घोषणा और निर्वाचन क्षेत्र के स्तर की घोषणाओं उपलब्ध असतील. याशिवाय निवडणुकांशी जोडलेल्या विषयांवर खुल्या चर्चेसाठी कूरीयल टाइममध्ये देसी भाषांमध्ये चॅट रूमसुद्धा सादर करेल. यादरम्यान मंचावर उपलब्ध लाइव फीचर्स यूजर्सना सेशन्स बनवणे, आपल्या कम्यूनिटीला सहभागासाठी आमंत्रित करणे आणि इंटरफेसच्या माध्यमातून घटना-घडामोडींबाबत लगेचच माहिती मिळवण्याची संधी देईल.


कू अँपमतदारांना त्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्यांबाबत शिक्षित करण्यासाठी भारतीय भाषामध्ये माहिती देणारे अभियानही चालवेल. यातून जनमानसाचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास वाढवण्यासह जागृती करण्याला बळकटी मिळेल. या अभियानांतर्गत कूयूजर्सना अनोखा अनुभव देण्यासाठी प्रश्नोत्तरंही आयोजित करेल. यात मतदार नोंदणी, EPIC कार्ड डाउनलोड इत्यादी विषय असतील. एवढेच नाही, तर मंचावर अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्वं आणि प्रख्यात लोक मतदाता जागरूकता अभियानाशी उत्स्फूर्तपणे जोडून घेतील. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी कटिबद्ध मंच कूआपल्या समर्पित 'निवडणूक स्वयंसेवकां'च्या माध्यमातून मतदार नोंदणीचा वेग वाढवण्यातही मदत करेल. या स्वयंसेवकांवर प्रत्येक निवडणूक क्षेत्रात मतदारांची नोंदणी करण्याची जबाबदारी आहे.
या मेड-इन-इंडिया प्लेटफॉर्मने याआधीच इंटरनेट अॅड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) च्या द्वारे 'स्वैच्छिक आचारसंहिता' अवलंबली आहे. यामाध्यमातून निवडणुकांच्या दरम्यान सोशल मीडियाच्या पारदर्शक वापरासाठी आहे. याशिवाय अयोग्य मजकुर ओळखत त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कू अँपने प्लेटफॉर्मवर येणाऱ्या फीडबॅकला प्रभावी नियोजन करण्याचे एक सशक्त तंत्रही स्थापन केले आहे.
कू अँपचे सह-संस्थापक आणि सीईओ अप्रमेय राधाकृष्ण म्हणाले, "भारतीयांच्या आवाजाचे लोकशाहीकरण करणारा एक बहुभाषी मंच या रूपात कू अँपनिवडणुकांदरम्यान काम करेल. कूवरचे विशेष फीचर्स यूजर्सना त्यांच्या मातृभाषेत रीयल टाइम अनुभव देतील. सोबतच यामाध्यमातून त्यांना निवडणुकांशी संबंधित विषयांवर पर समान विचारधारेच्या लोकांशी जोडून घेता येईल.
स्थानिक भाषामध्ये होणारे आमचे जागृती अभियान मतदारांचे ज्ञान वाढवणे, त्यांच्यात विश्वास जागवण्यासह डोळस निर्णय घेण्यात त्यांची मदद करतील. आम्ही एक निष्पक्ष, खुला आणि विश्वसनीय मंच म्हणून भारताच्या निवडणूक आयोगाद्वारा निर्धारित मार्गदर्शक तत्वांचे पालन करू. समाजात सकारात्मक आणि पुरोगामी परिवर्तन घडवण्यासाठी कू अँपचा सर्वोत्कृष्ट उपयोग केला जावा हेसुद्धा आम्ही खात्रीने पाहू.”