▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

गडचांदुर शहरातील दारु दुकाने हटविण्याची भिम आर्मीची मागणीगडचांदुर शहरात अत्यंत मध्यभागी देशी दारूची दुकाने पुनश्च सुरु झालेली आहेत. अचानक चौक या वर्दळीच्या ठिकाणी श्री गुलाब शेंद्रे यांचे देशी दारू दुकान सुरु झाले असून परिसरात मोठे दुर्गा मातेचे मंदिर असल्याने आविकांची व लागुनच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक असल्याने सामान्य शेतकरी, शिक्षक, निराधार महिल व विद्यार्थ्यांची मोठी ये-जा सुरु असते. अनेकदा या ठिकाणी तडीरामांनी मंदिरात येणाऱ्या भाविकांना बँकेचे ग्राहकांना चिल्लर पैशाकरिता त्रास देणे व महिलांना छेड़-छाड करणे सुरु केले आहे. परिसरातील रहिवासी बांधवाना व व्याप्पारी बांधवाना याचा मोठा त्रास सुरु झाला आहे..

त्याचप्रमाणे स्टेट बँक आफ इंडिया जवळ श्री रऊफ खान व इतर यांचे देशी दारू दुकान सुरु झाले असून एकमेव राष्ट्रीयकृत बँक असल्याने परिसरातील बँकेचे पुरुष, महिला, विद्यार्थी, शेतकरी व नोकरदार ग्राहकवर्ग सदर दारू दुकानामुळे त्रस्त झालेला आहे. बँकेचे परिसरात छेडखाणीचे प्रकार मोठ प्रमाणात वाढले आहे. यावर अंकुश लावणे कठीण झाले आहे. तसेच राजीव गांधी चौक येथे श्री भाऊरा रणदिवे व शहीद बिरसा मुंडा चौक येथे श्री दिगांबर लांजेकर व इतर यांची दुकाने सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात होत आहेत.त्यामुळे शहरातील मध्यभागी असलेले दारू दुकाने शहराच्या बाहेर नेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांना भिम आर्मीचे जिल्हा प्रमुख जितेंद्र डोहणे,जिल्हा उपप्रमुख मदन बोरकर व इतर नागरीकांच्या उपस्थीतीत देण्यात आले.