सुधिरभाऊच्या संकल्पनेला लोहारा ग्राम पंचायत फासत आहे "काळीख""""




चंद्रपूर (वि.प्र.) लोहारा ग्राम पंचायत मधील आरो वाटर प्लाॅट बंद असल्याने विहीरीतील दुषीत पाणी प्यावे लागत असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याबाबत ग्राम पंचायतचे संरपंच, उपाध्यक्ष,सचिव यांना विचारणा केले असता सर्वजण अनभिज्ञ आहेत.
आ.सुधिरभाऊ मुनगंटीवार (माजी अर्थ, वन,नियोजन तथा अध्यक्ष लोकलेखा समिती म.रा.) यांनी लहान मोठ्या सर्व ग्राम पंचायत स्तरावर गावातील नागरीकांना शुध्द पाणी पिण्यासाठी मंत्री पदावर असताना आरो वाॅटर प्लाॅट देण्यात आले.हे आरो वाॅटर प्लाॅंट गावातीलच एका बचत गटाला कंत्राटी पद्धतीने देखभाल दुरुस्ती साठी देण्यात आले आहे.बचत गटाचे ही याकडे दुर्लक्ष आहे.त्यामुळे लोहारा ग्राम पंचायतीत असलेल्या नागरिकांना वाटर प्लाॅट बंद असल्याने शुद्ध पाण्याचा लाभच मिळाले नाही.त्यामुळे सुधिर भाऊंच्या संकल्पनेला धुळीस मिळविल्या जात आहे.नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी आरो वाॅटर प्लाॅट जवळील व जिथे जनावरांचा वास्तव्य असलेल्या व सांडपाणी वाहत असलेल्या विहीरीच्या पाण्याचे उपयोग केला जात आहे. त्या विहीरीच्या ठिकाणी सभोवताल कचर्याने वेळलेले असून त्यातील पाणी अशुध्द आहे.आणि त्याच पाण्याचा पुरवठा गावातील नागरीकांना पिण्यासाठी दिला जातो.त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
वर्षभरापुर्वीच निवडणूक झाली या निवडणुकीत महीला सरपंच राखीव असल्याने प्रथम नागरिक संरपंच सौ.किरण चालखुरे हे आहेत.तर उपसरपंच शालीक मरस्कोले हे आहेत.यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले.इतकेच नव्हे तर उपसरपंच यांना आपल्या ग्राम पंचायत कार्यालयातील सचिव (ग्रामसेवक) कोण आहेत हेही त्यांना ठाऊक नाही.याबाबत सचिव यांना विचारणा केली असता त्यांनी गावकरीच आरोचे पाणी पित नसून प्रत्येक घरात त्या विहीरीचे नळ कनेक्शन देण्यात आले आहेत.तेच पाणी गावकरी पित असल्याची सचिव ए.एम.चौधरी यांनी सांगितले.