भटाळी परिसरात वाघाची दहशत वाघाचा बंदोबस्त करा अशी मागणी


चंद्रपूर प्रतिनिधी:- ताडोबा व्याघ्रप्रकल्प अंतर्गत येणारे भटाळी, किटली, पायली, तिरवंजा, चिंचोली या गावातील परिसरात ताडोबातील वाघाचे वास्तव आढळून आले. दरम्यान वाघाचे भीतीने त्या गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या एका आठवड्यात 3, 4 जनावरांची वाघाने शिकार केली आहे, त्यामुळे गावामध्ये सुद्धा दहशत निर्माण झाली, गावकऱ्यांना आपली जनावरे राखायची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे, आणि वाघाचे गावात सुद्धा हल्ल्यांचा प्रमाण वाढत आहे.
    वाघ गावाजवळ येऊन शिकार करत आहेत, त्यामुळे वाघाच्या दहशतीमुळे लोक घराच्या बाहेर पडायला भीत आहेत. गावलगतच कोळसा खान असल्याने सुद्धा वाघाचा शिरकाव जास्त आहे, लोक संध्याकाळी 6 नंतर घराच्या बाहेर पडायला भीत आहेत, त्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामात खूप अडथळे निर्माण होत आहे. वनविभागाने लवकरात लवकर यावर तातडीने त्या परिसरातील वाघाचा बंदोबस्त करून त्याला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी भटाळी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन उपरे व आकाश थेरे यांनी एक निवेदन देऊन केली व वनअधिकारी श्री कारेकर साहेबांनी लवकरात लवकर वाघाला जेरबंद करू असे आश्वासन दिले.